सामाजिक

मंचर (ता.आंबेगाव) येथील अण्णासाहेब आवटे महाविद्यालयात सावित्रीबाई फुले यांना अभिनव पद्धतीने केले अभिवादन !!

img 20260104 wa0888
img 20260104 wa0888

पंचनामा मंचर प्रतिनिधी – अण्णासाहेब आवटे महाविद्यालयात सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त रोल प्ले ॲक्टिव्हिटी सादर करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने झाली. या कार्यक्रमात स्वयंसेविका प्रतिक्षा भांड हिने सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील विविध प्रसंगांचे वर्णन करून त्यांचे जीवन दर्शन घडवले. तसेच स्नेहा कवरे, समृद्धी निघोट, सानिका शेवाळे, अर्चिता गायकवाड, गायत्री खेडकर, जेसीन शेख, भाग्यश्री भैये, तनिष्का घेवारी, सानिका मोढवे, आदिती चासकर या विद्यार्थिनींनी आपल्या अभिनयातून सावित्रीबाई फुले यांचे विचार सादर केले.

यावेळी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य मा. बाळासाहेब बेंडे तसेच अण्णासाहेब आवटे यांचे नातू अजय आवटे उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना आपल्या मार्गदर्शनातून प्रभावित केले. यावेळी उपप्राचार्य, प्रा. एस.आर. सालके, डॉ. एस.बी. मिसाळ, कार्यक्रम अधिकारी डॉ. एस.एस.उघडे, डॉ . एस.एस.पाटील, शिक्षक शिक्षिकेतर कर्मचारी आणि स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related posts

मंचर (ता.आंबेगाव) एस.टी.बस स्थानकाचा होणार कायापालट; ५ कोटी ३६ लाखांच्या विकासकामांना प्रशासकीय मंजुरी;मा.मंत्री दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या पाठपुराव्याला मोठे यश !!

Chief Editor

आद्य संस्थापक दत्तात्रय वळसे पाटील यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन

Chief Editor

नाते कलेचे माझ्या रक्ताशी – तमाशा क्षेत्रातील उत्कृष्ट खलनायक श्री. संभाजीराव कोल्हे

Chief Editor

Leave a Comment