सामाजिक

आवटे महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त भित्तिपत्रक स्पर्धेचे आयोजन !!

img 20260104 wa0878

पंचनामा मंचर प्रतिनिधी – रयत शिक्षण संस्थेच्या अण्णासाहेब आवटे महाविद्यालयामध्ये ३ जानेवारी २०२६ रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महिला सबलीकरण कमिटी व पॉश कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने भित्तिपत्रक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये समाजसुधारणा, महिला सक्षमीकरण व सुरक्षित कार्यसंस्कृती याविषयी जनजागृती करणे हा होता.

या स्पर्धेसाठी “सावित्रीबाई फुले यांचे समाजसुधारक म्हणून योगदान”, “शिक्षणातून परिवर्तन : सावित्रीबाई फुले यांचा दृष्टिकोन”, “महिलांची सुरक्षा आणि सक्षमीकरण” तसेच “POSH कायदा : प्रतिष्ठित व सुरक्षित वातावरण सुनिश्चित करणे” असे महत्त्वाचे विषय देण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी या विषयांवर सर्जनशील आणि आशयपूर्ण भित्तिपत्रके सादर केली.

भित्तिपत्रक स्पर्धेचे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य मा. बाळासाहेब बेंडे, तसेच अण्णासाहेब आवटे यांचे नातू अजय आवटे आणि डॉ. पुरुषोत्तम काळे या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड साहेब यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा आढावा घेत, आजच्या काळात महिलांच्या सुरक्षिततेसाठी पॉश कायद्याचे महत्त्व अधोरेखित केले.

या कार्यक्रमाचे आयोजन पॉश कमिटीच्या चेअरमन डॉ. शिल्पा शितोळे आणि महिला सबलीकरण कमिटीच्या चेअरमन डॉ. स्वप्ना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडले. कार्यक्रमास शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव आणि जबाबदारीची भावना निर्माण होण्यास मदत झाली.

Related posts

राज्यात साखर उत्पादन १० लाख टनांनी घटणार; उत्पादन १०० लाख टनांवर स्थिरावण्याची शक्यता !!

Chief Editor

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारगाव (शिंगवे) येथील चिमुकल्या शालेय विद्यार्थ्यांनी बाजाराच्या माध्यमातून घेतले व्यवहार ज्ञानाचे धडे !!

Chief Editor

कर्जमुक्ती योजनेतील ५० हजार रुपयांची अट काढली, २ लाखांपर्यंत कर्ज माफ- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Chief Editor

Leave a Comment