सामाजिक

आईच्या स्मृतीप्रित्यर्थ ‘लक्ष्मीतरू’ रोपांचे वाटप !!

1010834875
1010834875

पंचनामा सुलतानपूर प्रतिनिधी – सुलतानपूर गावातील जुन्या पिढीतील माता तसेच महाराष्ट्र शासनाचे सेवानिवृत्त जिल्हा अधिकारी संपतराव डावखर आणि सुलतानपूर गावचे सरपंच पंढरीनाथ डावखर यांच्या मातोश्री स्वर्गीय सगुनाबाई रतन डावखर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दशक्रिया विधीनिमित्त उपस्थितांना ‘लक्ष्मीतरू’ या औषधी वृक्षाची रोपे भेट देण्यात आली.

स्वर्गीय सगुनाबाई डावखर यांचा दशक्रिया विधी सुलतानपूर येथे संपन्न झाला. यावेळी ह. भ. प. भरत महाराज थोरात यांनी अध्यात्मिक प्रबोधन केले.

लोणी काळभोर-शिंदेवाडीचे सरपंच प्रभाकर जगताप यांनी ‘लक्ष्मीतरू’ वृक्षाचे आयुर्वेदातील महत्त्व विशद केले. विविध आजारांवर या वृक्षाच्या पानांचा उपयोग होत असल्याची माहिती त्यांनी दिली. पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकी जपत डावखर परिवाराने दशक्रिया विधीस उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीस ‘लक्ष्मीतरू’चे एक रोप भेट दिले.

यावेळी पंचायत समितीचे गटनेते संभाजी चव्हाण, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुधीर खोकराळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माऊली खंडागळे, संचालिका प्रियंका शेळके, पुणे जिल्हा दूध संघाचे संचालक बाळासाहेब खिलारी, महाराष्ट्र विद्युत मंडळाचे सेवानिवृत्त अधिकारी कोंडीभाऊ भोर, लोणी काळभोरचे सरपंच प्रभाकर जगताप, खोडदचे सरपंच शिवाजीराव खरमाळे, रविंद्र थोरात आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे ऋणनिर्देश ह. भ. प. डावखर महाराज यांनी व्यक्त केले.

92f4d25e 9686 4a0e aeae dca8fbad0e88 1 all 378997
1010806600

Related posts

शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या दुसरा हप्ता जारी ; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ६,३६,०३६ पात्र शेतकऱ्यांना ₹५,०८६ कोटी वितरीत !!

Chief Editor

व्यवहारातील कौशल्य आणि कल्पकतेचा अनोखा संगम म्हणजे आनंद बाजार : स्नेहलताई शेळके समर्थ गुरुकुलमध्ये ‘आनंद बाजार’ उत्साहात संपन्न !!

Chief Editor

समर्थ फार्मसी,बेल्हे मध्ये राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा उत्साहात संपन्न !!

Chief Editor

Leave a Comment