सामाजिक

पारगावच्या सेवा महानुभाव आश्रमात श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात !!

1010828450
1010828497

पंचनामा प्रतिनिधी – पारगाव (ता.आंबेगाव) येथील सेवा महानुभाव आश्रम (लोखंडे मळा) येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या धार्मिक उत्साहात साजरी करण्यात आली. शुक्रवारी (दि. ४) रात्री बारा वाजता भगवान श्रीकृष्ण जन्मोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त आश्रमात आकर्षक पाळण्याची सजावट करण्यात आली होती. यावेळी किसनबाबा अंकुळनेरकर व विजूताई लोणारकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

या सोहळ्यास पारगावचे मा. उपसरपंच विठ्ठल ढोबळे, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सेक्रेटरी रामनाथ हिंगे, लेखा प्रमुख राजेश वाक्चौरे, संगणक प्रमुख प्रमोद पाटील, पर्चेस अधिकारी ब्रिजेश लोहोट, स्टोअर कीपर अनिल बोंबले, सुरक्षा अधिकारी कैलास गाढवे, शंकर डोके, आदेश थोरात, धोंडीराम सुतार, अक्षय कुलकर्णी, प्रविण गरुड, नामदेव रिठे, सूर्यकांत बोंबे, महेश शिंदे, संजय हिंगे आदी मान्यवर उपस्थित होते.

1010828450

यावेळी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. खिचडी, चिक्की, केळी, वेफर्स, शेंगदाणा चिवडा आदी पदार्थांचा महाप्रसाद प्रमोद पाटील यांच्या वतीने आयोजित करण्यात आला. श्रीकृष्ण जन्मोत्सवामुळे आश्रम परिसर भक्तिमय वातावरणाने फुलून गेला होता.

1010760540
1010690614

Related posts

ग्रामपंचायत जवळेचा आदर्श उपक्रम; गावात केली प्लास्टिक बंदी !!

Chief Editor

अंतर्मनाच्या स्वातंत्र्याचा संदेश देणाऱ्या ‘मुक्ती पर्वा’चे आळेफाटा येथे भव्य आयोजन!

Chief Editor

महाराष्ट्र मंडळाच्या माजी विद्यार्थी संघातर्फे स्केटिंग स्पर्धाचे आयोजन !!

Chief Editor

Leave a Comment