सामाजिक

पंचनामा विशेष – २२ एप्रिल जागतिक वसुंधरा दिन !!

img 20260421 wa0118
img 20260421 wa0067

आपली शक्ती, युक्ती, मति, नीति, तुष्टी, पुष्टी, शांती, संपत्ती, समाधान, विवेक, वैराग्य इत्यादी सद्गुणांनी भरलेलं जीवन, समृद्ध होत राहो व ते तसं झालेलं याची देहि,याचि डोळा अनुभवण्यासाठी,आपणासर्वांस अत्युत्तम आरोग्य तसेच प्रदीर्घ आयुष्य लाभो यासाठीच आपण वसुंधरा वाचविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

आम्ही भूगोल फाउंडेशनच्या माध्यमातुन करतोय आपणही करा चला तर मग आज या मुहूर्तावर सुरुवात करुन भावी पिढीला एक नवा आदर्श देऊ!!

पृथ्वी दिन हा पृथ्वीच्या पर्यावरणाच्या संवर्धनासाठी जागृती करण्यासाठी हा दिवस जगभर पाळण्यात येतो.आपली पृथ्वी ही सुमारे ४.५० अब्ज वर्षांपूर्वी तयार झाली. अमेरिकेत २२ एप्रिल रोजी हा दिन पाळला जातो, तर संयुक्त राष्ट्रे २० मार्च रोजी, म्हणजे सूर्य पृथ्वीच्या विषुववृत्ताच्या थेट समोर असण्याच्या दोन बिंदूपैकी एका बिंदूशी पोचण्याच्या दिवशी, संपातबिंदू पॄथ्वी दिन पाळतात.
पृथ्वी दिनासाठी जॉन मक्डॉनेल याने बनवलेला अनधिकृत ध्वज
पर्यावरणरक्षणाची शिकवण देण्याच्या हेतूने अमेरिकेचा सिनेटर गेलॉर्ड नेल्सन याने २२ एप्रिल, इ.स. १९७० रोजी पहिल्यांदा पृथ्वी दिनाचे आयोजन केले.

जागतिक वसुंधरा दिन- पृथ्वी दिन २०२६ ची थीम ही आमची शक्ती, आमचा ग्रह आहे,जो आपल्या पर्यावरणाच्या भविष्याला आकार देण्यासाठी व्यक्ती आणि समुदायांची भूमिका अधोरेखित करणारी जागतिक कृती सुरू ठेवत आहे.

जागतिक वसुंधरा दिन हा पर्यावरण संरक्षणाला पाठिंबा दर्शवण्यासाठी जगभरात साजरा केला जाणारा एक वार्षिक कार्यक्रम आहे. भावी पिढ्यांसाठी आपल्या ग्रहाचे रक्षण करण्याच्या आपल्या जबाबदारीची आठवण करून देण्याचे काम तो करतो.पृथ्वीचे तापमान वाढवणाऱ्या हरितगृह वायूंचे उत्सर्जन २०५० पर्यंत दरवर्षी ७५ अब्ज टनांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे जी आजच्या तुलनेत जवळपास ५० टक्के वाढ आहे. यामुळे हवामान अस्थिर होईल आणि उष्णतेच्या लाटांमध्ये मोठी वाढ होईल, ज्याचा परिणाम २०५० पर्यंत पृथ्वीवरील जवळपास प्रत्येक व्यक्तीवर सुमारे ९.२ अब्ज लोकांवर होण्याची अपेक्षा आहे.पृथ्वीचे संरक्षण करणे, पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि हवामान बदलाच्या गंभीर समस्यांवर (प्रदूषण, जंगलतोड) उपाय शोधण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती करणे, हा या दिनाचा मुख्य उद्देश आहे.

पृथ्वीवरील जैवविविधतेचे रक्षण करणे, वाढते प्रदूषण रोखणे, ग्लोबल वॉर्मिंग कमी करणे आणि शाश्वत विकासाला प्रोत्साहन देणे.पर्यावरणाचे चार प्रमुख प्रकारांमध्ये वर्गीकरण करता येते,स्थलीय, जलीय, वातावरणीय आणि मानवनिर्मित पर्यावरण या प्रत्येक पर्यावरणाची स्वतःची वैशिष्ट्ये आहेत, जी हवामान, भूगोल आणि मानवी क्रियाकलाप यांसारख्या विविध घटकांद्वारे निर्धारित केली जातात.
वाढते प्रदूषण आणि अयोग्य जीवनशैली हेच पृथ्वीच्या सद्य:स्थितीमागील मुख्य कारण आहे. आपल्या एकुलत्या एका पृथ्वीचे संरक्षण करण्याच्या प्रत्येकाच्या जबाबदारीचे स्मरण करून देणे हेच जागतिक वसुंधरा दिनाचे भूगोल फाउंडेशनचे मुख्य उदिद्ष्ट आहे. आहे. ‘माणसाची प्रत्येक गरज पृथ्वी पूर्ण करू शकते पण हाव नाही’ अशा अर्थाचे महात्मा गांधींचे एक वचन आहे. हवा, पाणी, जंगले यांसारख्या पृथ्वीवरच्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा भसाभस अविचारी वापर केल्याने आणि वाढत्या प्रदुषणाचे परिणाम दिसतच आहेत आणि हे असेच चालू राहिले तर मानवाचेच भविष्य अंध:कारमय आहे हे निश्चित !

पृथ्वीचे तापमान वाढवणाऱ्या हरितगृह वायूंचे उत्सर्जन २०५० पर्यंत दरवर्षी ७५ अब्ज टनांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे – जी आजच्या तुलनेत जवळपास ५० टक्के वाढ आहे. यामुळे हवामान अस्थिर होईल आणि उष्णतेच्या लाटांमध्ये मोठी वाढ होईल, ज्याचा परिणाम २०५० पर्यंत पृथ्वीवरील जवळपास प्रत्येक व्यक्तीवर सुमारे ९.२ अब्ज लोकांवर होण्याची अपेक्षा आहे.पृथ्वीचा समतोल राखण्यासाठी महत्त्वाचे
वृक्षारोपण करावे आणि वृक्षतोड कमी करावी.नद्याचे जल स्वछ ठेवणे. आपल्या सभोवतालच्या पर्यावरणात स्वच्छता राखणे. शेतीत जैविक खतांचा वापर करा, रासायनिक खाते कमी वापर करणे. पर्यावरणाशी संबंधित मुद्द्यांवर जागरूकता वाढवणं आणि पृथ्वीच्या रक्षणासाठी प्रत्यक्ष कृतीची प्रेरणा देणं, हे वसुंधरा दिनाचं भूगोल फाउंडेशनचे उद्दिष्ट आहे.

fb img 1774661444136

यंदाची संकल्पना शाश्वत ऊर्जेकडे वळण्याची तातडीची गरज अधोरेखित करते आणि व्यक्ती, समूह आणि सरकारांना २०३० सालापर्यंत स्वच्छ ऊर्जेची निर्मिती तिप्पट करण्याचं आवाहन करते. हवामान बदलाचा सामना करण्यासाठी जीवाष्म इंधनावरचं अवलंबित्व कमी करणं, तसंच शाश्वत, समन्यायी आणि समावेशी ऊर्जा भविष्यासाठी गुंतवणूक करणं कसं महत्वाचं हे पटवून देणे.
याबाबत प्रबोधन करण्यासाठी २२ एप्रिल हा वसुंधरा दिन मानला जाऊ लागला.वसुंधरा दिनाची संकल्पना अमेरिकेतील गेलार्ड नेल्सन यांनी मांडली. त्यांनी अमेरिकेतील २ कोटींपेक्षा जास्त लोकांमध्ये पर्यावरणाच्या समस्यांबाबत जागृती केली. प्रदूषण आणि वन्यजीवांचा –हास या मुद्यावर तेथील समाजाच्या सर्व थरांतील लोकांनी आवाज उठवला. हवा, पाणी, वने आणि वन्यजीव, निसर्ग यांच्या संरक्षणासाठी तेथे मोठा राजकीय दबाव निर्माण झाला अशा प्रकारे १९७० सालापासून हा ‘अर्थ डे’ जगभर साजरा केला जात आहे.
पृथ्वीवरील पर्यावरणाचा समतोल राखण्यात सर्वात मोठी भूमिका आहे जंगलांची. अगदी शहरी भागातही भरपूर झाडे त्यानुसार सर्व प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष मार्गांनी जंगलतोड कमी करणे, अधिक झाडे लावणे, प्रदूषण घटवणे, योग्य जीवनशैली राखणे अशा मुद्यांवर सर्वांगीण जागृती व प्रसार करणे आवश्यक आहे.

पर्यावरण रक्षण माझी जबाबदारी हे केवळ वाक्य नसून, आपल्या अस्तित्वासाठी काळाची गरज आहे. वृक्षारोपण करणे, प्लास्टिकचा वापर टाळणे, पाणी आणि वीज वाचवणे, कचऱ्याचे वर्गीकरण करणे (ओला/सुका) आणि सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणे, या छोट्या कृतींतून मी वसुंधरेचे रक्षण करू शकतो. निसर्गाचा समतोल राखणे आणि भावी पिढीसाठी स्वच्छ, हिरवीगार पृथ्वी सोडून जाणे हे माझे आद्य कर्तव्य आहे.

पर्यावरण रक्षणासाठी माझी जबाबदारीमध्ये वृक्षारोपण आणि संवर्धन दरवर्षी किमान पाच झाडे लावून त्याचे संगोपन करणे
प्लास्टिक बंदी प्लास्टिक पिशव्यांऐवजी कापडी पिशव्या वापरणे, एकवेळ वापरल्या जाणाऱ्या (Single-use) प्लास्टिकचा त्याग करणे
कचरा व्यवस्थापन ओला आणि सुका कचरा वेगळा करणे, कंपोस्ट खत तयार करणे.

पाणी व वीज बचत – पाण्याचा अपव्यय टाळणे आणि गरजेनुसारच वीज वापरणे.
प्रदूषण नियंत्रण वैयक्तिक वाहनांऐवजी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणे, वाहनांची नियमित तपासणी (PUC) करणे.
जागरूकता आपल्या आसपासच्या लोकांना पर्यावरण रक्षणाचे महत्त्व पटवून देणे.
“पर्यावरण रक्षण, आपली सर्वांची जबाबदारी” या भावनेतूनच आपण शाश्वत भविष्याकडे वाटचाल करू शकतो.
या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणा-या व्यक्ती आणि संस्थांना विविध बक्षीसेही दिली जातात.

आपण काय करू शकतो
स्वत:ची जीवनशैली तपासून पर्यावरणास हानिकारक बाबींचा वापर टाळणे. स्थानिक प्रजातींची झाडे वापरून वृक्षारोपण करणे.अपारंपरिक योग्य उर्जास्रोतांचा वापर जास्तीतजास्त करणे…….

आपलाच पर्यावरण मित्र
श्री.विठ्ठल (नाना) राधाबाई झुंबरशेठ वाळुंज
भूगोल फाउंडेशन, पुणे,महाराष्ट्र,भारत,भुमाता वसुंधरा
9923426508

Related posts

समर्थ गुरुकुलचा (CBSE) दहावीचा १००% निकाल !!

Chief Editor

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अवसरी बु.शाळेने राज्यात पटकावला तेरावा क्रमांक !!

Chief Editor

राज्यात साखर उत्पादन १० लाख टनांनी घटणार; उत्पादन १०० लाख टनांवर स्थिरावण्याची शक्यता !!

Chief Editor

Leave a Comment