सामाजिक

धामणी (लोणी) येथे १५ जून रोजी संपन्न होणार सोमवती शाहीस्नान सोहळा !!

1009657006
1009657006

पंचनामा प्रतिनिधी – श्री कुलस्वामी म्हाळसाकांत खंडोबा देवस्थान धामणी (तालुका आंबेगांव) येथे १५ जूनला पारंपारिक सोमवती शाहीस्नान सोहळा होणार असल्याचे ग्रामस्थ.भाविक.मानकरी. खांदेकरी व सेवेकर्‍यांनी सांगितले.

हिन्दु धर्मात सोमवती अमावस्येला महत्वाचे आणि अत्यंत पुण्यवान मानले जाते.यंदाचे वर्षी(२०२६) सोमवती अमावस्या दीड वर्षानंतर अधिक जेष्ठ महिण्यात आल्यामुळे तिचे महत्व आणखी वाढलेले आहे.सोमवतीला भगवान महादेव व पार्वती अवतार श्री खंडेराय म्हाळसाईची पूजा केल्याने सुख समृध्दी प्राप्त होते अशी श्रध्दा असल्याचे वेदाचार्य वामन बाळकृष्ण मरकळे (आळंदी) यांनी सांगितले.

1009697721

मागील सन २०२४ चे वर्षात तीन सोमवती आलेल्या होत्या.शेवटची तिसरी सोमवती ३०डिंसेबर २४नंतर जवळजवळ दीड वर्षाने येत्या १५जूनला सोमवती आलेली आहे.सन २०२५ला संपूर्ण वर्षात एकही सोमवती आलेली नव्हती. रविवार दिंनाक १४जूनला दुपारी अमावस्येचा प्रारंभ होत असून त्यांचा कालावधी सोमवारी १५ जूनला सकाळी नऊ वाजेपर्यत असल्याचे व सोमवती अमावस्येचा उपवास १५जूनला सोमवारीच केला जाईल असे वेदाचार्य मरकळे गुरुजी यांनी सांगितले.धामणी येथील खंडोबा देवस्थान मंदिरात पहाटे ४ वाजता खंडोबाचे मानाचे काठीचे व सोमवतीचे परंपरागत मानकरी सर्वश्री नरके मंडळी(तळेगांव ढमढेरे.ता.शिरुर) राजगुरु मंडळी (अवसरी खुर्द.ता.आंबेगांव) पंचरास मंडळी (संविदणे व धामणी)कांदळकर मंडळी(कवठे.ता शिरुर) गावडे मंडळी (गावडेवाडी.ता.आंबेगांव) आवटे व पडवळ मंडळी (महाळूंगे.ता.आंबेगांव) आल्हाट मंडळी (येडगांव.ता.जुन्नर) घोडे (हाजी टाकळी.ता.शिरूर) आगरकर मंडळी(पाबळ.ता.शिरुर) यांच्या हस्ते स्वयंभू सप्तशिवलिंगाचा रुद्राभिषेक व दुग्धाभिषेक व आरती होईल त्यानंतर सकाळी सात वाजता मंदिरातून पंचधातूचे श्री खंडोबा.म्हाळसाई व बाणाईचे सर्वांगसुंदर लोभस मुखवटे पालखीतून पारंपारिक वाद्याच्या गजरात देवमळ्यातील विहीरीवरील सोमवती स्थानावर आणण्यात येऊन सोमवतीच्या ओट्यावर देवाच्या मुखवट्यांना मानकरी व भाविकांच्या हस्ते शाहीस्नान घालण्यात येऊन त्यानंतर सेवेकर्‍यांची पारंपारिक पुजा व आरती होणार आहे.

त्यानंतर पालखीची वाजतगाजत शाही मिरवणूक काढण्यात येणार आहे. श्री खंडोबाचे दर्शनासाठी व सोमवती सोहळ्याला येणार्‍या भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था केली असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.प्रदीर्घ कालावधीनंतर व अधिक महिण्यात सोमवती येत असल्याने देवकार्य करण्यासाठी व तळीभंडार करण्यासाठी पुणे.नगर.नाशिक.पिंपरी चिंचवड.भोसरी मुंबई परिसरातील भाविक मोठ्या प्रमाणावर येणार असल्याचे सेवेकरी मंडळीनी सांगितले.धामणी ग्रामस्थांनी सोमवती सोहळ्याची जोरदार तयारी केलेली आहे.

fb img 1774661444136
1009695330
1009693348

Related posts

धामणी गावात नारी शक्ती बोलती झाली;महिला दिनी उलगडली स्वकर्तुत्वाची गाथा !!

Chief Editor

समर्थ गुरुकुल मध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धा संपन्न ; ४३७ विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद !!

Chief Editor

शिरदाळे (ता.आंबेगाव) येथे ज्वारी पिक काढणीला सुरवात !!

Chief Editor

Leave a Comment