सामाजिक

समर्थ कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू;आरोग्यसेवेतील उज्ज्वल भविष्यासाठी सुवर्णसंधी;‘नर्सिंग’ हे क्षेत्र केवळ नोकरीपुरते मर्यादित नसून समाजसेवेचे एक प्रभावी माध्यम- वल्लभ शेळके

1009615157

पंचनामा प्रतिनिधी – आजच्या आधुनिक युगात आरोग्यसेवा क्षेत्राला जागतिक स्तरावर मोठे महत्त्व प्राप्त झाले असून, सेवाभाव, सुरक्षित करिअर आणि सामाजिक प्रतिष्ठेचे प्रतीक म्हणून ‘नर्सिंग’ क्षेत्र विद्यार्थ्यांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. देशासह परदेशातही प्रशिक्षित नर्सेसना वाढती मागणी असल्याने या क्षेत्रात करिअरच्या अमर्याद संधी निर्माण झाल्या आहेत. अशा पार्श्वभूमीवर जुन्नर तालुक्यातील नामांकित समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ कॉलेज ऑफ नर्सिंग, बेल्हे येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.

आरोग्यसेवेतील अत्यंत महत्त्वाचा दुवा म्हणून नर्सची भूमिका ओळखली जाते. रुग्णांची सेवा, उपचार प्रक्रियेत सहाय्य, आपत्कालीन सेवा, मानसिक आधार तसेच आरोग्य जनजागृती यामध्ये नर्सेसचे योगदान अनमोल मानले जाते.

समर्थ कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक सुविधा, अनुभवी प्राध्यापक वर्ग आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाची हमी देण्यात येत आहे. बी.एस्सी. नर्सिंग अभ्यासक्रमासाठी १२ वी विज्ञान शाखा (PCB) उत्तीर्ण व नर्सिंग CET पात्रता आवश्यक असून अभ्यासक्रमाचा कालावधी चार वर्षांचा आहे. महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या नियमानुसार प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
तसेच जीएनएम नर्सिंग व पी.बी. बीएस्सी नर्सिंगसारख्या अभ्यासक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना वैद्यकीय क्षेत्रात उज्ज्वल करिअर घडविण्याची संधी उपलब्ध होणार आहे. पी.बी. बीएस्सी नर्सिंग हा अभ्यासक्रम २०२६-२७ साठी प्रस्तावित असल्याची माहिती संस्थेचे सचिव विवेक शेळके यांच्या वतीने देण्यात आली.

महाविद्यालयामध्ये आधुनिक प्रात्यक्षिक प्रयोगशाळा, हॉस्पिटल ट्रेनिंग, क्लिनिकल अनुभव, सुरक्षित व शिस्तबद्ध वातावरण, व्यक्तिमत्त्व विकास तसेच करिअर मार्गदर्शनाच्या विशेष सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही उच्च दर्जाचे नर्सिंग शिक्षण घेण्याची सुवर्णसंधी प्राप्त होत आहे.
“दर्जेदार शिक्षण, उत्कृष्ट प्रशिक्षण आणि उज्ज्वल करिअरची खात्री” हे ब्रीद जपत समर्थ कॉलेज ऑफ नर्सिंग विद्यार्थ्यांच्या भविष्यास नवी दिशा देत आहे.

नर्सिंग शिक्षणानंतर विद्यार्थ्यांना सरकारी तसेच खासगी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होत आहेत. डीएमईआर, डीएचएस, शासकीय रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल्समध्ये स्टाफ नर्स, आयसीयू नर्स, ओटी नर्स, इमर्जन्सी नर्स अशा विविध पदांवर रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. याशिवाय कॅनडा, ऑस्ट्रेलिया, युके आणि आखाती देशांमध्ये भारतीय नर्सेसना मोठी मागणी असल्याने परदेशातही करिअरची दारे खुली होत आहेत.
‘नर्सिंग’ हे क्षेत्र केवळ नोकरीपुरते मर्यादित नसून समाजसेवेचे एक प्रभावी माध्यम असल्याचे संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके म्हणाले.

शैक्षणिक क्षेत्रात नर्सिंग ट्यूटर, क्लिनिकल इन्स्ट्रक्टर, लेक्चरर म्हणूनही विद्यार्थ्यांना करिअर घडविता येणार आहे. महिलांसाठी सुरक्षित, सन्मानाचे आणि आर्थिक स्थैर्य देणारे क्षेत्र म्हणून नर्सिंग व्यवसायाकडे पाहिले जात आहे.
बेल्हे नगर-कल्याण रोडवरील समर्थ कॉलेज ऑफ नर्सिंग (कॉलेज कोड : १५२१७२, CET कोड : ०९४५६) येथे प्रवेशाच्या अधिक माहितीसाठी ९९६००८१९०८ व ८६००७९७५७९ या क्रमांकावर विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

fb img 1774661444136

Related posts

शिरदाळे (ता.आंबेगाव) येथे ज्वारी पिक काढणीला सुरवात !!

Chief Editor

हजार लीटर दूधात शाम्पू, दूध पावडर आणि केमिकलचं ५०० लीटर पाणी;भेसळ खोरांचा पर्दाफाश !!

Chief Editor

पारगाव (शिंगवे) येथे उत्साहात संपन्न झाला शिवजयंती सोहळा!!

Chief Editor

Leave a Comment