सामाजिक

मिडगुलवाडी गावाला जिल्हा परिषदेकडून घंटागाडी !!

img 20260117 wa0715

पंचनामा कान्हुर मेसाई प्रतिनिधी – सध्या राज्यामध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाअंतर्गत जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींना तालुक्यामध्ये एक याप्रमाणे पुणे जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यातील पर्यावरण व स्वच्छतेसाठी चांगले काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना ही ई. व्ही .घंटागाडी देऊन सन्मान करण्याचा अभिनव उपक्रम पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी सुरू केला आहे.

यामध्ये शिरूर तालुक्यातील मिडगुलवाडी ग्रामपंचायतीला जिल्हा परिषदेकडून घंटागाडी देण्यात आली.घंटागाडी प्रदान करताना मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील ,उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे ,विद्यमान सरपंच नीताताई कोळेकर ,मा.सरपंच कैलासनाना मिडगुले ,ग्रामसेवक संतोष गायकवाड व ग्रामस्थ उपस्थित होते.

img 20260117 wa0703

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये गावाने तालुक्यातील सर्वात जास्त लोक वर्गणी जमा करणे, 100% कर वसुली करणे ,लोकसंख्येच्या प्रमाणात वृक्षारोपण करणे आदी आश्वासन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले.ग्रामपंचायत मिडगुलवाडी मध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान यशस्वीपणे राबवण्यासाठी पाटील गुरुजी यांचे अध्यक्षतेखाली गावामध्ये विविध उपक्रमांची सुरुवात व अंमलबजावणी यशस्वीपणे चालू आहे.सर्वांना प्रोत्साहन देण्यासाठी तालुक्याचे गटविकास अधिकारी श्री
महेश डोके यांचे बहुमूल्य योगदान आहे.

नवनवीन उपक्रमांची सर्व सदस्य, ग्रामस्थ, नागरीक व विविध विभागातील सर्व कर्मचारी परिश्रम घेत असल्याचे सरपंच निताताई कोळेकर यांनी सांगितले.

Related posts

आधुनिक काळातही तेवत आहे लोकपरंपरेचा दीप ; आखाडी उत्सवातून जपली जाते शेकडो वर्षांची सांस्कृतिक परंपरा !!

Chief Editor

निरगुडसर विद्यालयाच्या १४ वर्षांखालील क्रिकेट संघाचा तालुक्यात प्रथम क्रमांक ; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी संघाची निवड !!

Chief Editor

मांदळेवाडी येथे बिबटयाचा वावर वाढला ; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण !!

Chief Editor

Leave a Comment