सामाजिक

चांडोलीतील सुवर्णा आव्हाडची शैक्षणिक भरारी; शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यात ११ वा क्रमांक !!

1010556884
1010556884


चांडोली : प्रतिकूल आर्थिक परिस्थितीवर मात करत चांडोली (ता. आंबेगाव) येथील सुवर्णा बबन आव्हाड हिने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. चौथी शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ मध्ये २५६ गुण मिळवत तिने पुणे जिल्ह्यात ११ वा क्रमांक पटकावला आहे. तिच्या या यशाबद्दल परिसरातून कौतुक होत आहे.
सुवर्णा आव्हाड हिचे मूळ गाव नेवासा तालुक्यातील चांदा असून, तिचे कुटुंब गेल्या ३५ वर्षांपासून चांडोली येथे वास्तव्यास आहे. तिचे वडील बबन आव्हाड यांचे शिक्षण चौथीपर्यंत, तर आईचे शिक्षण सहावीपर्यंत झाले आहे. आई-वडील दोघेही मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. सुवर्णाला दोन बहिणी व एक भाऊ आहे.
अत्यंत साध्या व प्रतिकूल परिस्थितीतही सुवर्णाने शिक्षणाची जिद्द कायम ठेवली आहे. ती नम्र, शांत, मेहनती आणि प्रामाणिक स्वभावाची असल्याचे तिच्या शिक्षकांनी सांगितले.
सुवर्णाने NSSE राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेत २०० पैकी १८६ गुण मिळवत राज्यात पाचवा क्रमांक मिळवला आहे. तसेच राज्यस्तरीय अभिरूप परीक्षेत ३०० पैकी २६६ गुण मिळवून जिल्ह्यात चौथा क्रमांक पटकावला आहे.
आई-वडिलांच्या कष्टांची जाणीव ठेवून सुवर्णाने मिळवलेले हे यश विशेष कौतुकास्पद आहे. तिच्या सातत्यपूर्ण मेहनतीमुळे शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करण्याची क्षमता तिने सिद्ध केली असून, भविष्यात मोठे यश मिळविण्याचा तिचा निर्धार आहे.


आई-वडिलांच्या कष्टांना यशाची सलामी – सुवर्णाच्या यशामागे तिच्या आई-वडिलांचे कष्ट, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि स्वतःची अभ्यासातील सातत्यपूर्ण मेहनत आहे. आर्थिक परिस्थितीशी संघर्ष करत शिक्षणात मिळवलेले तिचे यश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

1010543616
1010527342

Related posts

निरगुडसर येथील पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक व दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील उच्च माध्यमिक विद्यालयातीलमुलींनी जवानांसाठी बनविल्या राख्या !!

Chief Editor

टॉप बँड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड चाकण, पुणे येथे समर्थ आयटीआय व पॉलिटेक्निकच्या ३८ विद्यार्थ्यांची निवड !!

Chief Editor

राजेश डोके यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या पुणे (उत्तर) जिल्हा संपर्क प्रमुखपदी नियुक्ती !!

Chief Editor

Leave a Comment