सामाजिक

समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये आविष्कार २०२६ उत्साहात संपन्नसहा विषयशाखांमध्ये ४७ विद्यार्थ्यांचा सहभाग; १२ विद्यार्थ्यांची विभागीय फेरीसाठी निवड !!

1011128013


पंचनामा प्रतिनिधी – समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बेल्हे येथे ‘आविष्कार २०२६’ अंतर्गत संस्थास्तरीय फेरी उत्साहपूर्ण व शैक्षणिक वातावरणात संपन्न झाली. विद्यार्थ्यांमधील संशोधनवृत्ती, नवकल्पना, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित या स्पर्धेत सहा विविध विषयशाखांमध्ये एकूण ४७ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाचा शुभारंभ सरस्वती पूजनाने झाला. समर्थ शैक्षणिक संकुलाचे कॅम्पस संचालक प्रा. राजीव सावंत यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांनी संशोधन व नवोपक्रमाकडे केवळ स्पर्धेच्या दृष्टिकोनातून न पाहता समाजोपयोगी आणि नाविन्यपूर्ण कल्पनांना प्रत्यक्ष रूप देण्याचा प्रयत्न करावा, असे मार्गदर्शन केले.
स्पर्धेत विद्यार्थ्यांनी विविध संशोधन संकल्पना, प्रकल्प आणि नाविन्यपूर्ण कल्पना परीक्षकांसमोर प्रभावीपणे सादर केल्या. प्रकल्पांचे मूल्यमापन नाविन्यता, संशोधनाची उपयुक्तता, वैज्ञानिक दृष्टिकोन, सादरीकरण कौशल्य आणि भविष्यातील उपयोगिता या निकषांच्या आधारे करण्यात आले.
विभागीय फेरीसाठी १२ विद्यार्थ्यांची निवड
मानवविद्या, भाषा व ललित कला-
ऋतुजा बोंबे, सिद्धी तांबे,वाणिज्य, व्यवस्थापन व विधी-वैष्णवी मोरे, प्रणाली गंधकते.
शुद्ध विज्ञान-लितेज शिरतर, कल्याणी घोगरे.
कृषी व पशुसंवर्धन-ईश्वरी राऊत,सानिया जमादार.
अभियांत्रिकी व तंत्रज्ञान-आदितीऔटी, नेहा मिडगुले.
वैद्यक व औषधनिर्माणशास्त्र-ऋषिकेश सोमवंशी रोहित नवाळी.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. कुलदीप रामटेके यांनी आगामी विभागीय फेरीची माहिती दिली. दि. २४ ऑक्टोबर २०२६ रोजी समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बेल्हे येथे ‘आविष्कार २०२६’ची विभागीय फेरी आयोजित करण्यात आली असून, निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी अधिक आत्मविश्वासाने आणि परिपूर्ण तयारीने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके आणि प्रशासकीय अधिकारी प्रा. प्रदीप गाडेकर, डी.फार्मसी विभागप्रमुख डॉ. शीतल गायकवाड यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून आगामी विभागीय फेरीसाठी शुभेच्छा दिल्या.
स्पर्धेचे आयोजन समन्वयक प्रा. शुभम गडगे आणि डॉ. शीतल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. विविध प्रकल्पांचे मूल्यमापन डॉ. सचिन दातखिळे, डॉ. सागर तांबे, डॉ. शुभांगी हाडवळे, प्रा. काजल वाळुंज आणि प्रा. श्रद्धा खळदकर यांनी केले.
या प्रसंगी विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

1011111248

Related posts

पारगाव (शिंगवे ) येथील चिचगाई स्मशानभूमी परिसर सुधारणा भूमिपूजन संपन्न !!

Chief Editor

केंद्र सरकारच्या उत्कृष्ट सेवा पदकाने API चंद्रकांत लोहकरे यांचा गौरव !!

Chief Editor

चिमुकल्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शैक्षणिक साहित्य वाटप !!

Chief Editor

Leave a Comment