सामाजिक

पारगाव (शिंगवे ) येथील विद्युत वाहक खांब बनले आहेत धोकादायक !!

1009726764
1009726779

पंचनामा प्रतिनिधी – पारगाव (शिंगवे) येथील घोडनदिच्या लगत तीन ते चार विद्युत वाहक विजेचे खांब एका बाजूला खचलेले असून ते कधीही कोसळू शकतात अशी त्यांची स्थिती.

मागील काही दिवसांपूर्वी पाऊस व चक्रीवादळ झाल्यामुळे एका बाजूने खांब संपूर्ण खचलेल्या अवस्थेत आहेत हि बाब महावितरण कंपनीच्या माध्यमातून दुरुस्ती करून द्यावी अशी मागणी मा.उपसरपंच विठ्ठल सिताराम ढोबळे यांनी महावितरण कंपनीकडे केली असून सदर खांब हे शेतकऱ्यांच्या शेतातून जात असून सदर शेतामध्ये ऊस तसेच आजूबाजूच्या शेतात देखील उसाचे प्रमाण जास्त आहे.चालू मेनलाईन मध्ये खांब खाली पडल्यास दुर्घटना घडू शकते म्हणून तात्काळ सदर तीन ते चार खांब दुरुस्ती करून द्यावी अशी मागणी शेतकरी अनिल बाबाजी ढोबळे तसेच इतर ग्रामस्थांनी केली आहे.सदर ठिकाणी महावितरण कंपनीचे लाईनमन व्हि एम जमदाडे यांनी पाहणी केली असून लवकरात लवकर दुरुस्तीसाठी आम्ही महावितरण कार्यालयात कळविले असल्याचे सांगण्यात आले.

1009726764
92f4d25e 9686 4a0e aeae dca8fbad0e88 1 all 353521
1009722798
1009725327

Related posts

समर्थ मध्ये कौशल्य विकास कार्यशाळा उत्साहात संपन्न !!

Chief Editor

आपलं असणं आणि आपलं हसणं हे आपणचं जपलं पाहीजे”

Chief Editor

तब्बल 15 वर्षांनंतर देशभरात आजपासून जनगणनेचा प्रारंभ, दोन टप्प्यात जनगणना !!!

Chief Editor

Leave a Comment