सामाजिक

आषाढी वारी पालखी सोहळ्यानिमित्त काटेवाडी येथे वारकऱ्यांसाठी आरोग्यसेवा ;उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते औषधोपचार किटचे वाटप

1010218823

आषाढी वारी पालखी सोहळ्यानिमित्त वारकऱ्यांच्या आरोग्य संरक्षणासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, काटेवाडीच्या वतीने विशेष आरोग्य सेवा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते दिंडी प्रमुखांना औषधोपचार किटचे वाटप करण्यात आले.

यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, गटविस्तार अधिकारी किशोर माने, तालुका विस्तार अधिकारी सुनील जगताप, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामपंचायतीचे पदाधिकारी उपस्थित होते.

वारकऱ्यांना तातडीची व दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी डॉ. बापू दडस यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य पथक कार्यरत होते. पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करून आवश्यक औषधोपचार करण्यात आले.

1010218823

प्राथमिक आरोग्य केंद्र, काटेवाडीच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली देवकाते यांनी दिलेल्या माहितीनुसार, या उपक्रमाअंतर्गत ९०० हून अधिक वारकऱ्यांवर औषधोपचार करण्यात आले, तर प्रकृतीची आवश्यकता लक्षात घेऊन १६ वारकऱ्यांना आंतररुग्ण म्हणून दाखल करून आवश्यक उपचार देण्यात आले.

पालखी सोहळ्यादरम्यान वारकऱ्यांच्या आरोग्याची प्रभावी काळजी घेण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, काटेवाडीमार्फत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे वारकरी व नागरिकांनी स्वागत केले.

1009850407

Related posts

शिंगवे (पारगाव) येथे अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ गाव बंद; जनआक्रोश मोर्चा

Chief Editor

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरदाळे यांना सेवा निवृत्त शिक्षक मा.मुख्याध्यापक श्री.दादाभाऊ झुंबरराव शेलार यांच्याकडून धनादेश सुपुर्द !!

Chief Editor

नाते कलेचे माझ्या रक्ताशी – कै. संध्याताई रमेश माने

Chief Editor

Leave a Comment