सामाजिक

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जवळे येथे बालचमूचा दिंडी सोहळा उत्साहात संपन्न !!

1010225958

पंचनामा प्रतिनिधी : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जवळे येथे पारंपरिक दिंडी सोहळ्याचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थी व विद्यार्थिनींनी वारकऱ्यांची आकर्षक वेशभूषा परिधान करून हातात टाळ, गळ्यात मृदुंग आणि डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन विठ्ठल नामाचा गजर करत दिंडीत सहभाग नोंदविला. संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला.
या दिंडी सोहळ्यास शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, ग्रामस्थ तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

1010225946

विद्यार्थ्यांमध्ये वारकरी परंपरेचे संस्कार रुजावेत, संत परंपरेची ओळख व्हावी आणि भारतीय संस्कृतीचे जतन व्हावे, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

1010225944

या उपक्रमाचे नियोजन व आयोजन मुख्याध्यापक चेतन बेंढारी , सहशिक्षिका वनिता बरभाई मॅडम, अंगणवाडी सेविका शालण सोनवणे, शशिकला गावडे यांनी केले. उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे कौतुक करत अशा सांस्कृतिक उपक्रमांमुळे मुलांमध्ये संस्कार, शिस्त आणि सामाजिक जाणीव विकसित होत असल्याचे मत व्यक्त व्यवस्थापण चे अध्यक्ष ह.भ.प वैभव महाराज शिंदे यांनी व्यक्त केले या वेळी ,हरिचंद्र शिंदे मा सरपंचं ,पंढरी टाव्हरे,बबन बोराटे,अवी वाळुंज,सचिन गावडे,दत्ता गायकवाड,राजाराम शिंदे,विवेक लायगुडे,विलास महाराज,निरंजन शिंदे किसन लोखंडे,संजय निघोट,मनीषा टाव्हरे उपसरपंच,कविता शिंदे,सोनल शिंदे,प्रतीक्षा शिंदे,नयन खालकर,प्रियांका एलभोर सुरेखा खालकर , हर्षदा शिंदे,शैला गावडे पुष्पा इंदोर अशा गावडे,सविता तांबे,अर्चना लोखंडे, या सह महिला भगिनी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते अशी माहिती शाळेचे माजी अध्यक्ष उत्तम शिंदे पाटील यांनी दिली..

Related posts

आवटे महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त भित्तिपत्रक स्पर्धेचे आयोजन !!

Chief Editor

पद्मश्री मा.रघुवीर खेडकर यांच्या तमाशा रंगमंचावरील पहिल्या एन्ट्रीचा किस्सा !!

Chief Editor

मंचर–लोणी–शिरूर व राजगुरूनगर–पाबळ–लोणी शटल बस सेवेच्या मागणीची एसटी प्रशासनाकडून दखल !!

Chief Editor

Leave a Comment