सामाजिक

डॉ. अलेक्झांडर गिबसन समाधी – भारतीय वनसंवर्धनाचा प्रेरणादायी वारसा !!

img 20260522 wa0259
1009557592

पंचनामा विशेष – भारतातील वनसंवर्धनाच्या इतिहासात ज्यांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते, असे महान वनस्पती-शास्त्रज्ञ व वन-शास्त्रज्ञ म्हणजे डॉ. अलेक्झांडर गिबसन!!

दिनांक २२ मार्च १८४७ रोजी भारताचे पहिले वनसंरक्षक म्हणून त्यांची नियुक्ती झाली आणि त्यानंतर भारतीय वनव्यवस्थेचा मजबूत पाया रचण्याचे ऐतिहासिक कार्य त्यांनी केले.

वनसंपदेचे महत्त्व ओळखून तिच्या संरक्षणासाठी त्यांनी केलेले योगदान अतुलनीय मानले जाते. भारतीय वनशास्त्राच्या इतिहासात त्यांची कारकीर्द सुवर्ण अक्षरांनी कोरली गेली असून, त्यांच्या कार्यामुळेच वनसंवर्धनाला एक शास्त्रीय दिशा मिळाली.

जुन्नर तालुक्यातील हिवरे येथे असलेले त्यांचे समाधीस्थळ आजही त्यांच्या महान कार्याची साक्ष देत उभे आहे. समाधीच्या शेजारीच त्यांचे निवासस्थानही पाहावयास मिळते. सन १८६९ मध्ये डॉ. गिबसन अनंतात विलीन झाले. त्यांच्या पत्नीने प्रेम व आदरापोटी उभारलेली ही स्मृती आणि मालमत्ता महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाला समर्पित करण्यात आली.

1009557590

डॉ. गिबसन यांच्या पुण्यतिथीच्या शताब्दी वर्षानिमित्त वन विभागाने त्यांच्या स्मृतीस्थळाचा जीर्णोद्धार करून त्यांच्या कार्याला अभिवादन केले. निसर्ग, वनसंवर्धन आणि पर्यावरण यासाठी आयुष्य अर्पण करणाऱ्या या महान व्यक्तिमत्त्वाचे समाधीस्थळ आज इतिहास, पर्यावरण आणि प्रेरणेचा अनमोल ठेवा ठरले आहे.

📷✍️ रमेश खरमाळे (माजी सैनिक, निसर्गमित्र)

fb img 1774661449199

Related posts

धामणी (लोणी) ते ठाणे मुक्कामी गाडीने प्रवाशांना दिलासा !!

Chief Editor

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अवसरी बु.शाळेने राज्यात पटकावला तेरावा क्रमांक !!

Chief Editor

जिल्हा परिषद माॅडेल स्कुल शिंगवे शाळा पूर्वतयारी मेळाव्याचे आयोजन !!

Chief Editor

Leave a Comment