सामाजिक

डॉ.डी.वाय.पाटील कॉलेज ऑफ ॲग्रीकल्चर बिझनेस मॅनेजमेंट, आकुर्डी, पुणेच्या विद्यार्थ्यांकडून जवळे (ता.आंबेगाव) गावात वृक्षारोपण उपक्रम उत्साहात संपन्न !!

img 20260522 wa0291

पंचनामा प्रतिनिधी – पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील जवळे गावामध्ये डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ ॲग्रीकल्चर बिझनेस मॅनेजमेंट, आकुर्डी, पुणे येथील विद्यार्थ्यांच्या वतीने वृक्षारोपण व पर्यावरण जनजागृती उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.पर्यावरण संवर्धन, हरित ग्राम संकल्पना मजबूत करणे तसेच भविष्यातील पिढ्यांसाठी स्वच्छ व निरोगी वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.

महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.एम. डी. जगताप, समन्वयक प्रा. एस. एन. पाटील सर तसेच एबीएस अधिकारी प्रा. वैशाली घोलप मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी गाव परिसरात विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड केली. विद्यार्थ्यांनी वृक्षांचे पर्यावरणीय महत्त्व, जलसंधारणामधील योगदान तसेच हवामान बदल रोखण्यासाठी वृक्षसंवर्धनाची गरज याबाबत ग्रामस्थांमध्ये जनजागृती केली.

1009557991

या उपक्रमासाठी ग्रामपंचायतीच्या आदर्श सरपंच सौ. वृषालीताई उत्तम शिंदे पाटील,तसेच हरिश्चंद्र शिंदे, चेतन बेंढारी सर व जवळे ग्रामस्थ यांचे विशेष सहकार्य लाभले. त्यांनी विद्यार्थ्यांना आवश्यक मार्गदर्शन करून गावातील शाळा परिसर, अंगणवाडी, अशा विविध ठिकाणी वृक्षलागवडीसाठी मदत केली. तसेच गावातील नागरिकांनीही विद्यार्थ्यांसोबत सक्रिय सहभाग घेत उपक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले या मध्ये जालिंदर लायगुडे, रघुनाथ सोनवणे,मारुती शिंदे,अशोक लोखंडे,यश वाळुंज, शशीकला गावडे,ग्रामस्थांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळाले.

या उपक्रमामध्ये प्रिया घाटोळ,श्रुतिका जाधव,अनुष्का हांडे,सोनिया दुधगावकर, राजनंदिनी वागज,तनिषा फुलसुंदर आणि सुहानी मोरे यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.विद्यार्थ्यांच्या या सामाजिक उपक्रमाचे सरपंचं यांनी कौतुक करत भविष्यातही असे उपक्रम राबविण्यास प्राधान्य देण्यात येईल.

1009558016

विशेष बाब म्हणजे महिला कृषी विद्यार्थिनींना गावकऱ्यांकडून मोठा पाठिंबा व सहकार्य मिळाले. विद्यार्थिनींनीही उत्साहाने वृक्षलागवड, जनजागृती आणि नियोजनाची जबाबदारी पार पाडत सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण सादर केले. ग्रामीण भागात पर्यावरण संरक्षणासाठी युवक व विद्यार्थ्यांचा सहभाग किती महत्त्वाचा आहे, याचे उत्तम उदाहरण या उपक्रमातून पाहायला मिळाले.

“एक झाड म्हणजे फक्त वृक्ष नाही, तर पुढील पिढीसाठी दिलेला शुद्ध श्वास आहे.”

fb img 1774661449199

Related posts

निरगुडसर ( ता.आंबेगाव ) येथे आंबेगाव तालुका माध्यमिक शाळा सेवकांच्या सहकारी पतसंस्थेची ४७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न !!

Chief Editor

डिंभे धरणाचा उजवा कालवा पाणी नव्हे तर प्लॅस्टिक वस्तू वाहण्याचे उत्तम साधन !!

Chief Editor

मनुष्याला सर्व सोंगे आणता येतात;परंतु परमार्थ आणि पैशाचे सोंग आणता येत नाही- ह.भ.प.लक्ष्मण महाराज नागरे

Chief Editor

Leave a Comment