सामाजिक

जीवन प्रवासात “भाग्य” हे लिप्ट सारख आहे तर “मेहनत” ही शीडी सारखी आहे..!!

1009498163

पंचनामा विशेष – आयुष्यातील प्रवासात जेंव्हा वादळं येतात तेंव्हा आपण आपल्या मातीत घट्ट रूजून रहायचं असतं..कारण वादळं ही जितक्या वेगानं येतात तितक्या च वेगानं ती निघून जातात.. म्हणूनच येणारं वादळ तेवढं महत्वाचं कधीच नसतं; तर प्रश्न असतो आपण त्याच्याशी झुंज कशी दिली..आणि त्यातून कितपत सावरलो..!

श्रीमद्भगवद्गीतेत साफ शब्दात सांगीतलेलं आहे की “आयुष्यात कधीच निराश होऊ नकोस, कमजोर तुझी वेळ आहे तू नाही..” हे संसारूपी सागर आवश्यकतेच्या नियमानुसार चालत असते.. हिवाळ्यात ज्या सुर्याची आतुरतेने वाट बघितली जाते.. त्याच सुर्याचा ऊन्हाळया त तिरस्कार पण केला जातो.. आपली किंमत तोपर्यंतच असते जोपर्यंत आपली आवश्यकता असते..तलाव एकच असतो पण त्या तलावात हंस मोती शोधतो आणि बगळा मासळी. केवळ विचारांचा फरक असतो.. आपले विचारच आपल्याला मोठं किंवा श्रेष्ठ बनवत असतात…जर आपल्याला त्या गुलाबासारखं खुलायचं असेल तर त्याच्या त्या काट्यासोबत ताळमेळ जुळवून घेण्याची कला शिकून घ्यावी लागेल..

जंगलामध्ये रोज सकाळी सकाळी हरीण हा विचार करते की मला त्या वाघापेक्षा जोरात पळायचं आहे नाहीतर तो वाघ मला पकडून खाऊन टाकेल.. आणि त्याच वेळेस वाघ सकाळी ऊठल्यानंतर विचार करतो की मला त्या हरीणापेक्षा जोरात पळावं लागेल नाहीतर मला उपाशीच मरावं लागेल…!
म्हणजेच तुम्ही हरीण असा अथवा वाघ.. त्यामुळे कोणताच फरक पडणार नाही.. जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल चांगल जीवन जगायचं असेल तर रोज सकाळी पळांवचं लागेल काही न करता (संघर्षाविना) काहीच मिळत नसतं.
पराभव हा पहिल्यांदा रणांगणात कधीच होत नसतो तर तो आपल्या मनात प्रथम होतो..जी माणसं मनाने पराभूत असतात ती रणांगणात जिंकू शकत नाहीत..आणि जी माणसं मनाने जिंकलेली असतात ती रणांगणात पराभूत होऊच शकत नाहीत..पहिल्यांदा मन जिंकणे महत्वाचे मग रण आपोआप जिंकले जाते.. लोखंडाला इतर कुणी नष्ट करू शकत नाही..पण त्याचा स्वतःचा गंजच त्याला नष्ट करू शकतो..तसेच माणसालाही कोणीच नष्ट करू शकत नाही..त्याच्या मनाचा दृष्टिकोन च त्याला नष्ट करू शकतो…
मानवी जीवनातील चढ-उतार हे माणसाच्या जगण्यासाठी आवश्यक असतात…कारण ई.सी.जी. च्या सरळ रेषेचा अर्थही मृत्यू दर्शवितो…!

“लक” हा शब्द दोन अक्षरांचा आहे, “भाग्य” हा अडीच अक्षरांचा आहे, “नशीब” तीन अक्षरांचा आहे..आणि “किस्मत” साडेतीन अक्षरांचा आहे तरीपण हे चारही शब्द चार अक्षरांपासून तयार झालेल्या “मेहनत” या शब्दापेक्षा छोटेच आहेत..!
मृगाकडे कस्तुरी आहे, फुलात सुगंध आहे, पर्वताकडे स्थिरता आहे, सागराकडे गंभीरता आहे, चंद्राकडे शितलता आहे, सूर्याकडे तेजस्विता आहे, नदीकडे गतिशीलता आहे तर माझ्याकडे काय आहे. असं म्हणून रडत बसू नका..तर अंधाराला जाळणारा एक सुर्य तुमच्याकडे पण आहे..आव्हान करा त्या सूर्याला, मग उगवेल तो तुमच्याही आयुष्यात नवीन क्षीतीजे घेऊन, अंधारी रात्र संपवून सोनेरी किरणांनी सजवून. मग उगवेल रोजच एक नवीन सकाळ ऊत्साह आणि ध्येयाने भरून म्हणूनच तर या आयुष्यावर प्रेम करा आणि त्याला फुलवत रहा सदैव नित्य नियमाने..
सुखासाठी कधी कधी हसावं लागतं तर कधी रडावं पण लागतं कारण सुंदर धबधबा बनायला त्या पाण्यालाही ऊंचावरून पडावं लागतं.. जीवन प्रवासात मेहनत ही सीडी सारखी असते तर भाग्य हे लिप्ट सारखं असते..लाईट गेल्यावर कोणत्याही क्षणी लिप्ट बंद पडू शकते परंतू सीडी ही आपल्याला नेहमीच ऊंचीवर घेऊन जाते…!!
यशाची व्याख्या प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळी असू शकते,_ पण यशाचा मार्ग मात्र एकाच गोष्टीतून जातो,ती म्हणजच आपली “जिद्द”
आयुष्यात संकटे कोणाला येत नाहीत? फरक फक्त इतकाचं असतो की,काही लोकं संकटांत कोसळून जातात,तर काही लोकं त्याच संकटांना यशाची शिडी बनवून वर चढतात.
लक्षात ठेवा
ध्येयापर्यंत पोहोचताना अनेकदा अपयश येईल,लोकं नावं ठेवतील,परिस्थिती विरोधात जाईल पण अशा वेळी, स्वतःवरचा विश्वास ढळू देऊ नये.
हरलेली बाजी पुन्हा जिंकता येते,पण हरलेलं मन जिंकणं कठीण असतं.
म्हणून स्वतःला दररोज सांगा की, “मी हे करू शकतो.”
कधीकधी आपल्याला वाटते की आपल्याकडे पुरेशी साधनं नाहीत,पण इतिहास साक्षी आहे की मोठ्या गोष्टी ह्या शून्यातूनच निर्माण झाल्या आहेत.
तुमची आजची मेहनत उद्याचं तुमचं भविष्य ठरवणार आहे.
थकवा येईल,पण थांबायचं नाही.
कारण समुद्राची लाट जेव्हा मागे जाते,तेव्हा ती अधिक वेगाने पुढे येण्यासाठीच मागे गेलेली असते.
तुमचा संघर्ष जेवढा मोठा असेल,तुमचं यश तेवढं दिमाखदार असेल.
स्वप्नं पाहणं सोपं असतं,पण ती पूर्ण करण्यासाठी रात्रीची झोप आणि दिवसाचं चैन गमवावं लागतं.
_ज्या दिवशी तुमच्या कामात सातत्य येईल,त्या दिवशी जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला यशस्वी होण्यापासून रोखू शकणार नाही.


श्री.निळकंठ बाबाराव पाटील मैलापूरे, कारेगावकर..*
छ. संभाजीनगर-४३११३६
मो. नं. – 9881084320


fb img 1774661444136

Related posts

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंगवे शाळेतील किशोरवयीन मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी उपक्रम !!

Chief Editor

मंचर–लोणी–शिरूर व राजगुरूनगर–पाबळ–लोणी शटल बस सेवेच्या मागणीची एसटी प्रशासनाकडून दखल !!

Chief Editor

लोणी(धामणी ) गावचे सुपुत्र निवृत्ती आदक यांची राज्यकर उपायुक्तपदी पदोन्नती !!

Chief Editor

Leave a Comment