सामाजिक

स्वच्छ भगूर – सुंदर भगूर अभियानांतर्गत आठवडे बाजार परिसरात विशेष स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न !!

1009562351
1009562348

पंचनामा नाशिक प्रतिनिधी -भगूर शहर स्वच्छ, निरोगी व सुंदर ठेवण्याच्या उद्देशाने भगूर नगर परिषद नगराध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांच्या अध्यक्षतेखाली व क्रीएट्व्ह कुटीर फाऊंडेशन (NGO) यांच्या संयुक्त विद्यमाने भगूर येथील आठवडे बाजार परिसरात विशेष स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

भगूर शहरातील आठवडे बाजारानंतर परिसरात मोठ्या प्रमाणात भाजीपाला, प्लास्टिक, थर्माकोल तसेच इतर ओला-सुका कचरा पसरलेला दिसून येतो. त्यामुळे परिसरात दुर्गंधी निर्माण होऊन डासांची वाढ, अस्वच्छता व आरोग्यविषयक समस्या निर्माण होण्याचा धोका वाढत आहे. या गंभीर प्रश्नाची दखल घेत नगर परिषद प्रशासन व सामाजिक संस्थांच्या संयुक्त सहभागातून ही विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

अभियानादरम्यान बाजार परिसरातील रस्ते, नाल्यांच्या कडेला साचलेला कचरा तसेच सार्वजनिक ठिकाणी टाकण्यात आलेला प्लास्टिक व भाजीपाला कचरा साफ करण्यात आला. यासोबतच नागरिक, व्यापारी व भाजी विक्रेत्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत ओला व सुका कचरा वेगळा ठेवणे, कचरा घंटागाडीतच टाकणे, सार्वजनिक ठिकाणी कचरा न फेकणे आणि शहर स्वच्छतेत प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.

1009562344

या उपक्रमात क्रीएट्व्ह कुटीर फाऊंडेशनच्या शितल उगले व त्यांच्या टीमने सक्रिय सहभाग घेत जनजागृती केली. सामाजिक संस्थांच्या सहभागामुळे शहर स्वच्छतेच्या मोहिमेला अधिक बळ मिळत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

नगराध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांनी सांगितले की, “स्वच्छता ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेणे गरजेचे आहे. नागरिकांनी ओला व सुका कचरा वेगळा करणे, प्लास्टिकचा वापर कमी करणे आणि सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखणे ही काळाची गरज आहे.”

यावेळी नगरसेवक विशाल बलकवडे, प्रसाद अडके, अश्विनी भवर, सुजाता शिरसाठ, मृत्युंजय कापसे, रोहन कुंडारीया, विशाल शिरसाठ यांच्यासह क्रीएटिव्ह कुटीर फाऊंडेशनचे टीम सदस्य अंबिका देवरगावकर, शुभम मुठ्ठल, पंकज मालपानी, जावेद शेख, विशाल प्रजापती, मयुरेश शिंदे, अमृता खोपडे तसेच असंख्य नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

fb img 1774661444136

“स्वच्छ भगूर – सुंदर भगूर” हा उपक्रम पुढील काळातही सातत्याने राबविण्यात येणार असून शहरातील विविध भागांमध्ये अशा प्रकारच्या स्वच्छता मोहिमा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

Related posts

धामणीत पाडव्याच्या मुहर्तावर खंडोबाला चंदनउटी !!

Chief Editor

जीवन प्रवासात “भाग्य” हे लिप्ट सारख आहे तर “मेहनत” ही शीडी सारखी आहे..!!

Chief Editor

लोणी (धामणी ) येथे महाशिवरात्री यात्रेनिमित्त शर्यतीमध्ये धावले ३५० बैलगाडे !!

Chief Editor

Leave a Comment