सामाजिक

साकोरे मळा (शिंगवे ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला स्मार्ट टी.व्ही.ची भेट !!

img 20260215 wa0863
img 20260215 wa0863

पंचनामा पारगाव (शिंगवे) प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील साकोरेमळा येथील गुणवत्ता प्रधान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला मुंबई येथील उच्च न्यायालयातील वरिष्ठ वकील रेश्मा देसाई यांच्या पुढाकारातून स्मार्ट टीव्ही प्रदान करण्यात आला.ॲड.ओमकार ढोबळे, पारगावचे मा.उपसरपंच विठ्ठल ढोबळे यांच्या शुभहस्ते स्मार्ट टीव्ही प्रदान करण्यात आला.या उपक्रमामुळे शाळेच्या डिजिटल शिक्षणाला नवे बळ मिळाले आहे.

शिंगवे येथील ही शाळा गुणवत्तेच्या बाबतीत तालुक्यातच नव्हे तर पुणे जिल्ह्यातही नावारूपाला आली आहे.विविध शैक्षणिक व स्पर्धा परीक्षांमध्ये येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करून शाळेचा लौकिक वाढवला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अधिक प्रभावी शिक्षण मिळावे या उद्देशाने स्मार्ट टीव्हीची देणगी देण्यात आली.

या कार्यक्रमप्रसंगी ऍड.ओमकार ढोबळे,पारगावचे मा.उपसरपंच विठ्ठल ढोबळे,अजय घारे,अक्षय ढोबळे,गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर ओंकार ढोबळे,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल वाव्हळ,मुख्याध्यापक बाबाजी गाढवे,सहशिक्षक नितीन शेजवळ,सुभाष वाव्हळ तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्याध्यापक बाबाजी गाढवे यांनी शाळेच्या गुणवत्तापूर्ण वाटचालीची माहिती देत विविध उपक्रमांचा आढावा सादर केला. शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी स्थानिक स्तरावर मिळणाऱ्या सहकार्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

img 20260213 wa0495

कार्यक्रमाच्या शेवटी नितीन शेजवळ यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.या स्मार्ट टीव्हीमुळे विद्यार्थ्यांना डिजिटल माध्यमातून शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होऊन शैक्षणिक गुणवत्ता अधिक वृद्धिंगत होईल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

साकोरेमळा जिल्हा परिषद शाळेला स्मार्ट टीव्ही प्रदान करताना मान्यवर.

Related posts

पुणे जिल्ह्यातील दुष्काळ यादीवर आक्षेप; आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागासह ‘या’ गावांचा समावेश करण्याची शेतकरांची मागणी

Chief Editor

डिंभे धरणाचा उजवा कालवा पाणी नव्हे तर प्लॅस्टिक वस्तू वाहण्याचे उत्तम साधन !!

Chief Editor

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढोबळेवाडी (जारकरवाडी) येथे उत्साहात संपन्न झाला चिमुकल्यांचा आठवडे बाजार !!

Chief Editor

Leave a Comment