
पंचनामा बेल्हे प्रतिनिधी – समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे येथे नुकतेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळ समर्थ कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अँड मॅनेजमेंट,समर्थ कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स व समर्थ लॉ कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने “निर्भय कन्या अभियाना” अंतर्गत संकुलातील विद्यार्थीनींसाठी ‘कराटे प्रशिक्षण कार्यक्रमा’ चे आयोजन करण्यात आले होते.या अभियानामध्ये संकुलातील ४५०हून अधिक विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या.
स्त्री-सबलीकरण आणि सक्षमीकरण काळाची गरज आहे.संकुलामध्ये महिला सबलीकरण,व्यक्तिमत्व विकास,स्वास्थ्य,महिला उद्यमशीलता,स्त्री-पुरुष समानता यांसारख्या उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थिनींना बौद्धिक,शारीरिक,मानसिक व भावनिक इ.स्तरावर सक्षम बनविण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला जातो.कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थिनींमध्ये आत्मसंरक्षणाचे कौशल्य विकसित करणे,आत्मविश्वास वाढवणे व सुरक्षिततेबाबत जनजागृती करणे हा होता.

कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून पोलीस हवालदार सुनील गिरी,दिपक नागरे उपस्थित होते. तसेच कराटे प्रशिक्षक महेंद्र गुळवे व किशोर काकडे यांनी विद्यार्थिनींना प्रत्यक्ष प्रशिक्षण देत आत्मसंरक्षणाच्या विविध तंत्रांचे प्रात्यक्षिक दाखवले.
प्रशिक्षणादरम्यान महिलांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक खबरदारी, आत्मरक्षणासाठी त्वरित वापरता येणाऱ्या उपाययोजना व मानसिक सक्षमतेचे महत्त्व यावर मार्गदर्शन करण्यात आले.विद्यार्थिनींनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत प्रत्यक्ष सराव केला.
अशा प्रकारचे उपक्रम राबविल्याने विद्यार्थिनी निर्भय,सक्षम व आत्मविश्वासपूर्ण बनतील,तसेच समाजात महिलांच्या सुरक्षिततेबाबत सकारात्मक संदेश जाईल,असे मत पोलीस हवालदार सुनील गिरी यांनी व्यक्त केले.

मुलींना अथवा महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी निर्भया पथकामार्फत केलेली तक्रार व नाव गोपनीय पद्धतीने ठेवून त्यावर कारवाई केली जाते.रोड रोमिओ यांच्याकडून शाळा-महाविद्यालयातील मुलींना त्रास होऊ नये म्हणून शाळा,कॉलेज आवारामध्ये निर्भया पथका मार्फत योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचे दिपक नागरे यांनी सांगितले.
यावेळी विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यात आले.
कराटे प्रशिक्षक महेंद्र गुळवे यांनी मुलींना स्वसंरक्षण करण्यासाठी आवश्यक असलेल्या वेगवेगळ्या डावपेचाची माहिती प्रात्यक्षिकासह देण्यात आली.गुंड अथवा अपप्रवृत्तीच्या हातून स्वतःचा बचाव करण्यासाठी प्रथमदर्शनी करावयाची उपाययोजना तसेच घ्यावयाची काळजी याचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले.
स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आपल्या हाताच्या साह्याने,पायाच्या साहाय्याने किंवा वेगवेगळ्या शारीरिक तंत्रशुद्ध प्रात्यक्षिकांच्या साह्याने कशाप्रकारे आत्मसंरक्षण करू शकतो याचं प्रात्यक्षिक दाखवले.

प्रशिक्षकांनी लाठी-काठी चे प्रयोग आणि स्वसरक्षणासाठी च्या आवश्यक कसरती व प्रात्यक्षिके याचे प्रशिक्षण दिले.विद्यार्थिनींनीही या सर्व प्रशिक्षणामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,माजी जिल्हा परिषद सदस्या सौ.स्नेहल ताई शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट चे प्राचार्य डॉ.नवनाथ नरवडे,बी सी एस चे प्राचार्य डॉ.उत्तम शेलार,डॉ.लक्ष्मण घोलप आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे नियोजन क्रीडा संचालक एच पी नरसुडे यांच्या मार्गदर्शनाखाली अभियांत्रिकी चे विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.निलेश नागरे,बी सी एस चे प्रा.गणेश बोरचटे,लॉ कॉलेज च्या प्रा.निकम भारती,उपप्राचार्य प्रा.शिवाजी कुमकर,प्रा.दिनेश जाधव,क्रीडा शिक्षक सुरेश काकडे यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर यांनी तर आभार क्रीडा संचालक एच पी नरसुडे यांनी मानले.

