सामाजिक

शिरदाळे (ता.आंबेगाव ) येथील तरुणांचा अभिनव उपक्रम;महाशिवरात्री निमित्ताने गावात राबवले ग्राम स्वच्छता अभियान!!

img 20260216 wa0784
img 20260216 wa0784

पंचनामा लोणी (धामणी) प्रतिनिधी – शिरदाळे (ता.आंबेगाव ) येथे रविवार (दि.१५) रोजी महाशिवरात्री निमित्त ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी गावातील सर्व तरुण मंडळी तळ्यावरील व महादेव मंदिराच्या परिसरात जमले होते.

शिवरात्री असल्याने महादेवासमोर महाप्रसादाचा कार्यक्रम होता.सर्व तरुणांनी महाप्रसाद घेतल्यावर एक नेक काम करण्याचे ठरवले तसेच आपण आपल्या गावचे नागरिक तसेच भविष्य या नात्याने तळ्याच्या कडेला पडलेला कचरा,रस्त्याच्या कडेला पडलेल्या बॉटल,इतर प्लास्टिक कचरा साफ करण्याचे ठरवले आणि बघता बघता सर्व परिसर एक तासात स्वच्छ करून घेतला.त्यामुळे तरुणांनी केलेल्या या सुंदर उपक्रमाचे ग्रामस्थ कौतुक करत आहेत.

तळ्याच्या लगत रोज महिला कपडे धुण्यासाठी तसेच भांडी धुण्यासाठी,जनावरे पाणी पिण्यासाठी येत असतात.तळ्याच्या लगतचा कचरा हा तसाच त्या पाण्यात जात असतो तेच पाणी आपल्याला वापरण्यासाठी येत असते.त्यामुळे या तरुणांनी हा स्तुत्य उपक्रम राबवला आहे.

fb img 1771121534243

महिन्यातून एक दिवस तरी असा कचरा साफ केला तरी गावचा मुख्य परिसर स्वच्छ राहण्यास मदत होईल.या स्तुत्य उपक्रमात जगदीश रणपिसे,संकेत तांबे,सोमनाथ तांबे,महेश चौधरी,राज तांबे,श्रीनाथ तांबे,हृतिक सरडे,पूजा सरडे व गावातील यूवकांनी उत्सूपूर्तपणे सहभाग नोंदवला अशी माहिती माजी सरपंच मयूर सरडे यांनी दिली आहे

Related posts

निधन वार्ता – कै.सौ.कलाबाई नामदेव सुक्रे यांचे अल्पशा आजाराने निधन..

Chief Editor

पंचनामा विशेष – आठवणीतील माणसे…

Chief Editor

समर्थ च्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय प्रकल्प स्पर्धेत यश !!

Chief Editor

Leave a Comment