सामाजिक

शेवभाजी…..!!

img 20260731 wa0490

1010399330
1010399330

साभार लेख – मोहन वामने (काका)

काल सकाळीच सवयीप्रमाणे, “सध्या भाजीलाच काही मिळतं नाही “ची घोषणा घरात झाली….!

रात्रीचं दोन वेगवेगळ्या प्रकारचे शेव पुढे येऊन पडले होतेच घरात….!

आणि सकाळचा मेनू ठरला, ” “
” शेवभाजी “….!

दुपारी जेवायला बसलो आणि आठवली,” लाला “….!

लाला म्हणजे ” श्रीमंती शकुंतला रघुनाथ शेठ दिवटे “….!

आमची “शाकू मावशी “, “आईची “शकुंतला “, पण काय कोणास ठाऊक ती अनेकांची,” लाला “च होती…..!

बहुतेक त्या काळात धामणीत एकमेव हॉटेल असावं.” हनुमान हिंदू हॉटेल “….!

” आमचे येथे सर्व धर्मीय लोकांना मुक्त प्रवेश आहे ” अशा आशयाचा, काळ्या बोर्डावर पांढऱ्या अक्षरात लिहिलेला बोर्ड लहानपणी तिथे वाचण्यात येत असे….!

रघुनाथ शेठ आणि लाला त्यांच्या हॉटेल मध्ये सकाळी सहा पासून रात्री आठ पर्यत कष्ट करीत असतं…!

शेव, पापडी, चिवडा, गोडी शेव, लाडू, भेळ, भजी, मिसळ इत्यादी त्या काळी हॉटेलात खाल्ले जाणारे पदार्थ रोज ताजे ताजे बनवून विकले जातं असतं….!

दोघेही खूप प्रेमळ, आणि कष्टाळू त्यामुळं गिर्हाईकांची वर्दळ हॉटेलात नेहमीच असे…!

त्या काळी आसपास च्या सर्वांच्याच घरी, एकमेकींने केलेले भाजी पदार्थ वाटी वाटीतून पोहचविले जातं असतं.

आमच्या आणि दिवटे च्या घरामध्ये केवळ एक भिंत च अंतर आमच्या कडं कोण रडतंय ते तिकडं ऐकू जातं असे, आणि समजायवायला लगेच कोणी न कोणी येत असतं….!

” शेव भाजी ” हा लाला च्या सुगरण शैलीतील आवडता पदार्थ असावा….!

जसं नेहूलकर आजींनी रात्री केलेल्या, “शेंगुळी “कांदा तिखट मीठ घालून केलेली “चटणी ” आमच्या घरी सकाळीच पोहचत असे तसं,लालाने केलेली शेवभाजी ची एक वाटी आमच्या घरी हमखास पोहचत असे,….!

रोजच स्वतः नेच बनाविलेल्या शेव ची भाजी करणं लाला साठी मुळीच अवघड नव्हतं…!

बहुतेक वेळी लालाच्या शेवभाजी चा आणि आजींच्या शेंगुळी चटणीचा खाण्याचा मानकरी मीच असे…..!

काही खास मसाल्याची पेरणी त्यात केली जातं नसावी. ती
एकदम साध्या पद्धतीने केलेली भाजी असे, पण चवीला., एकदम टेस्टी….!

आज हॉटेल बाहेर, बोर्ड लावून खात असलेली शेवभाजी खात असलो तरी.” लालाच्या हातानं बनवलेली, “शेवभाजी “एकदम खास….!

” शेवभाजी “हा केवळ घरच्या जेवणातील पदार्थ आहे, त्याचा व्यवसाय करू नये असा समज त्याकाळी असावा…!

आज लालाने बनविलेली,”शेवभाजी “व्यवसायात उतरली असती तर….?

मोहन वामने
8087459030

Related posts

इम्पॅक्ट पंचनामाच्या बातमीचा – पारगाव, दत्तात्रयनगर येथे बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने लावला पिंजरा !!

Chief Editor

श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्ताने पारगाव (शिंगवे) येथे संपन्न झाले गुरूचरित्र पारायण, गृह पठण !!

Chief Editor

आमरण उपोषणासाठी बसलेल्या धामणी गावच्या ग्रामस्थांना परिसरातील गावांनी दिला जाहीर पाठिंबा; पुणे जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी उपोषणस्थळी भेट देत केली चर्चा !!

Chief Editor

Leave a Comment