सामाजिक

इम्पॅक्ट पंचनामाच्या बातमीचा – पारगाव, दत्तात्रयनगर येथे बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने लावला पिंजरा !!

1009486424
1009486423

पंचनामा प्रतिनिधी -आंबेगाव तालुक्यातील पारगाव, दत्तात्रयनगर येथे भीमाशंकर सहकारी कारखान्याच्या पूर्वेला राहणाऱ्या संतोष बबन ढोबळे यांच्या शेतात मुक्कामासाठी असलेल्या बापू शिंदे व बबन शिंदे यांच्या वाड्यावर बिबट्याने हल्ला केला होता.बिबट्याच्या या हल्यात दीड वर्षीय घोडीचा मृत्यू झाला होता.

या ठिकाणी पिंजरा लावण्याची मागणी मा.उपसरपंच विठ्ठल ढोबळे, सामाजिक कार्यकर्ते बजरंग देवडे यांनी केली होती. या मागणीला वन विभागाने सकारात्मक प्रतिसाद देत घटनास्थळी पिंजरा लावला आहे.

यावेळी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सुरक्षा अधिकारी कैलास गाढवे, संतोष ढोबळे, वन विभाग कर्मचारी अशोक जाधव, रामदास वळसे उपस्थित होते.

मागणीची तत्काळ दखल घेतल्याबद्दल वनविभागाच्या वन मंडळ अधिकारी नीलम चव्हाण यांचे ग्रामस्थानी आभार मानले आहेत.

fb img 1774661444136

Related posts

आवटे महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त भित्तिपत्रक स्पर्धेचे आयोजन !!

Chief Editor

१९६८/६९बॅचचे माजी विद्यार्थी सत्तावन्न वर्षानी भेटले एकत्र !!

Chief Editor

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंगवे शाळेतील किशोरवयीन मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी उपक्रम !!

Chief Editor

Leave a Comment