सामाजिक

धोकादायक विहिरीला बसवले कठडे;पारगाव (शिंगवे) परिसरातील वाहतूक सुरक्षित !!

img 20260414 wa0394

पंचनामा प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील पारगाव गावठाण ते लोखंडेमळा -दातखिळेमळा रस्त्यालगत असलेली विहीर वाहतुकीसाठी धोकादायक ठरत होती. याबाबत प्रशासनाने तत्काळ कारवाई करत विहिरीभोवती सुरक्षात्मक कठडे उभारले आहेत. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक आता सुरक्षित झाली आहे.

img 20260414 wa0395

पारगाव कारखाना पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन कांडगे यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी विहीरमालक सुभाष कुशाबा लोखंडे यांना संभाव्य अपघाताचा धोका लक्षात आणून देत सुरक्षेसाठी कठडे बसविण्याची विनंती केली.

या विनंतीला प्रतिसाद देत सुभाष लोखंडे यांनी सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत तातडीने सहकार्य दर्शविले.त्यानुसार विहिरीभोवती लोखंडी कठडे व संरक्षक जाळी बसविण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे.विहिरीला कठडे बसविण्याची मागणी मा.उपसरपंच विठ्ठल ढोबळे,ग्रामपंचायत सदस्य काळूराम लोखंडे यांनी मागणी केली होती.त्यांची ही मागणी लोखंडे यांनी पूर्ण केली आहे त्यामुळे परिसरात समाधानाचे वातावरण पसरले आहे.

fb img 1774661444136

Related posts

बुरसेवाडी (ता.खेड) येथे शेतकरी प्रशिक्षण व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन !!

Chief Editor

सौ.गायत्री नचिकेत अवधानी ( राजगुरव ) यांची “मानद वन्यजीव रक्षक ” या पदी नियुक्ती !!

Chief Editor

रणरणत्या उन्हात तिघांची सायकलवारी; माऊलींच्या पालखी मार्गाने प्रवास !!

Chief Editor

Leave a Comment