सामाजिक

मिशन लक्ष्यवेध योजनेंतर्गत खेळाडू निवड चाचणी होणार १४ व १५ जुलै रोजी !!

1010123609

पंचनामा प्रतिनिधी – मिशन लक्ष्यवेध योजनेंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा प्रतिभा विकास केंद्रासाठी ॲथलेटिक्स, हॉकी आणि रोईंग या खेळांच्या खेळाडू निवड चाचण्यांचे आयोजन दि. १४ व १५ जुलै २०२६ रोजी करण्यात आले आहे.

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी येथे सकाळी १० वाजता ॲथलेटिक्स व हॉकीच्या निवड चाचण्या होणार आहेत. रोईंगची निवड चाचणी दि. १४ जुलै रोजी सकाळी १० वाजता एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठ, लोणी काळभोर येथे होईल.

२५ वर्षांखालील महाराष्ट्रातील राज्यस्तरीय पदकविजेते किंवा राष्ट्रीय स्तरावरील सहभागी खेळाडू पात्र असून, निवड चाचणीसाठी जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र, आधार कार्ड, मागील दोन वर्षांतील क्रीडा कामगिरीची प्रमाणपत्रे, मूळ कागदपत्रे, सत्यप्रती आणि तीन पासपोर्ट आकाराचे फोटो सोबत आणावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी सुरेश काकड (८८८८८०६१५८), ज्योती सूर्यवंशी (९०७५०४०३२०), मनीषा माळी (७३९१९६८१९२) किंवा मनीषा दिवेकर (९७६४३८५१५२) यांच्याशी संपर्क साधावा.

1009850407

Related posts

बी. जे. एस. विद्यालय वाघोली येथील डॉ.विष्णू देवडकर विद्यापीठाच्या (Ph.D.) पदवी ने सन्मानित !!

Chief Editor

शिंगवे (पारगाव) येथील बिबट्या अखेर जेरबंद !!

Chief Editor

धर्मपुरीत संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून भक्तिमय वातावरणात व मोठ्या उत्साहाने स्वागत !!

Chief Editor

Leave a Comment