सामाजिक

वारकरी सेवेतून मानवतेचा वसा— समर्थ आयुर्वेदिक हॉस्पिटलतर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषध वाटप !!

1010120119


“वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलाची सेवा” या उदात्त भावनेतून समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर बेल्हे, यांच्या वतीने चैतन्य महाराज ओतूर ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्यानिमित्त राजूरी येथे वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषध वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला वारकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
पायी वारीदरम्यान वारकऱ्यांना होणारा शारीरिक थकवा, सांधेदुखी, पायदुखी, सर्दी, ताप, रक्तदाब तसेच इतर किरकोळ आजारांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली. आवश्यकतेनुसार आयुर्वेदिक औषधांचे मोफत वितरण करून आरोग्यविषयक मार्गदर्शनही करण्यात आले. समाजाप्रती असलेली बांधिलकी जपत राबविण्यात आलेल्या या सेवाभावी उपक्रमामुळे वारकऱ्यांनी समाधान व्यक्त करत समर्थ आयुर्वेदिक हॉस्पिटलच्या कार्याचे मनापासून कौतुक केले.
या उपक्रमाचे नियोजन समर्थ आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे प्राचार्य डॉ. संजय लोंढे, डॉ. रमेश पाडेकर, डॉ. मधुसूदन कुऱ्हाडे, डॉ. रश्मी चव्हाण, डॉ. श्रवंती तोडचिरकर, डॉ. जयश्री मते, डॉ. कृतिका कांबळे, डॉ. स्नेहल गायकवाड तसेच प्रा. मानसी गवळी, यशवंत फापाळे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.
या सेवाभावी उपक्रमाबद्दल संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊली शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या स्नेहलताई शेळके, कॅम्पस डायरेक्टर राजीव सावंत, प्राचार्य डॉ. संजय लोंढे तसेच प्रशासकीय अधिकारी प्रा. प्रदीप गाडेकर यांनी आयोजकांचे अभिनंदन करत समाजहितासाठी असे उपक्रम सातत्याने राबविण्याची गरज व्यक्त केली.
समर्थ आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरने वारकरी संप्रदायाच्या सेवेतून सामाजिक उत्तरदायित्वाचा आदर्श निर्माण करत ‘सेवा, संस्कार आणि समर्पण’ या मूल्यांचा प्रत्यय पुन्हा एकदा समाजाला करून दिला.

Related posts

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना २०२६जिल्ह्यात ४३ हजाराहून अधिक शेतकऱ्यांनी केले आधार प्रमाणीकरण- जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप

Chief Editor

शिरदाळे (ता.आंबेगाव ) येथील तरुणांचा अभिनव उपक्रम;महाशिवरात्री निमित्ताने गावात राबवले ग्राम स्वच्छता अभियान!!

Chief Editor

सागदरा सहकारी उपसा जलसिंचन योजनेच्या चेअरमनपदीसोमनाथ शंकर जाधव पाटील तर व्हाइस चेअरमनपदी भानुदास महादू जाधव पाटील यांची बिनविरोध निवड!!

Chief Editor

Leave a Comment