सामाजिक

काठापुर बुद्रुक (ता.आंबेगाव) येथील वनविभागातील अतिक्रमणे हटवली !!

img 20260213 wa0511

पंचनामा पारगाव (शिंगवे) प्रतिनिधी – काठापुर बुद्रुक (ता.आंबेगाव) या ठिकाणी वनविभागाच्या हद्दीमध्ये काही अतिक्रमकांनी सामूहिकरित्या राखीव वनक्षेत्रामध्ये अपप्रवेश करून अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला.परंतु वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हे अतिक्रमण तात्काळ निष्कासित केले.

काठापुर बुद्रुक (ता.आंबेगाव) या ठिकाणी काही अतिक्रमकांनी वनविभागाच्या हद्दीमध्ये बुधवारी दुपारी तात्पुरत्या स्वरूपाच्या कोप्या उभ्या केल्या होत्या. त्यानंतर जुन्नर वन विभागाच्या पथकाने या ठिकाणी येऊन त्यांना समज दिली. सदर कोप्या अतिक्रमकांना स्वतःहून काढुन घेण्यास सांगितले.परंतु त्यांनी न ऐकल्याने सदर कोप्या वनविभागाच्या वतीने काढून टाकून हे अतिक्रमण भारतीय वन अधिनियम १९२७ मधील तरतुदी अंतर्गत कारवाई करण्यात आली. यावेळी अतिक्रमकांनी सोबत आणलेले किराणा, भांडी धान्य इ. साहित्य त्यांच्या ताब्यात देऊन वनविभागाच्या हद्दीतुन बाहेर काढले.

img 20260213 wa0510

यावेळी सहाय्यक वनसंरक्षक जुन्नर अमृत शिंदे, म्हणाले “सदर अतिक्रमकांचे वन हक्क अधिनियम,२००६ मधील तरतुदीनुसार १३डिसेंबर २००५ पूर्वी वनक्षेत्रावर सदर दावेदार यांचा वनक्षेत्रावर ताबा असल्याचा कोणताही अभिलेखी पुरावा त्यांनी सादर न केल्याने यापूर्वीच त्यांचे दावे सदरील अधिनियमाचे तरतुदीनुसार घटीत ग्राम स्तरावरील ग्राम वन हक्क समिती, उपविभागस्तरविल उपविभाग स्तरीय समिती व जिल्हा स्तरावरील मा. जिल्हाधिकारी पूणे यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा स्तरीय समितीने सदर दावे नामंजूर केलेले आहेत.

तसेच यापूर्वीही सदर अतिक्रमकानी वनक्षेत्रावर अतिक्रमण केल्याने त्यांचेवर वनगुन्हे दाखल करण्यात आले असता मा. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, घोडेगांव यांनी सदर अतिक्रमण बेकायदेशीर ठरवत त्यांना दोषी देखील ठरविलेले आहे. सदर प्रकरणी या अतिक्रमकांनी राष्ट्रीय जनजाती आयोग दिल्ली येथे दावा दाखल केला असून त्यावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.

“राखीव वनक्षेत्रामध्ये अपप्रवेश करून अतिक्रमण करणे भारतीय अधिनियम १९२७ नुसार दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा असून तो दंडनीय अपराध आहे.”

सदर कारवाई आशिष ठाकरे वनसंरक्षक पुणे वनवृत्त व प्रशांत खाडे उपवनसंरक्षक जुन्नर यांचे मार्गदर्शनाखाली, परिविक्षाधीन उपवनसंरक्षक लोकेश पाटील, सहाय्यक वनसंरक्षक जुन्नर अमृत शिंदे, सहाय्यक वनसंरक्षक जुन्नर स्मिता राजहंस, मंचर वनपरिक्षेत्र अधिकारी विकास भोसले, जुन्नर वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण ,ओतुर वनपरिक्षेत्र अधिकारी चैतन्य कांबळे, वनपाल निलम चव्हाण, वनरक्षक पूजा कांबळे व वनविभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी या कारवाई सहभाग घेतला.

यावेळी माजी सरपंच अशोक करंडे,माजी उपसरपंच विशाल करंडे, पोलीस पाटील अमोल करंडे व ग्रामस्थ उपस्थित होते.

img 20260213 wa0496

Related posts

आई वडिलांची,देशाची सेवा करा; तरुणांनी व्यसनापासून दूर रहा – ह. भ.प.निवृत्ती महाराज देशमुख

Chief Editor

धामणी (लोणी) गावच्या शिरपेचात मानाचा तुरा ; विठ्ठल जाधव यांना शंकर पाटील गुंफण पत्रकारिता पुरस्कार जाहीर !!

Chief Editor

समर्थ गुरुकुल मध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धा संपन्न ; ४३७ विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद !!

Chief Editor

Leave a Comment