सामाजिक

समर्थ मध्ये आंतरविभागीय कुस्ती व वेटलिफ्टिंग स्पर्धा उत्साहात संपन्न !!

img 20260220 wa0362

पंचनामा बेल्हे प्रतिनिधी – समर्थ रुरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट संचलित समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बेल्हे तसेच इंटर इंजिनिअरिंग डिप्लोमा स्टुडंट्स स्पोर्ट्स असोसिएशन (IEDSSA) यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरविभागीय कुस्ती व वेटलिफ्टिंग स्पर्धा २०२५–२०२६ समर्थ क्रीडा प्रबोधिनी मध्ये यशस्वीरीत्या पार पडल्या.

img 20260220 wa0354

स्पर्धेची सुरुवात भारताचे ऑलिम्पिक पदक विजेते खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके, सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके सर, माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके, कॅम्पस डायरेक्टर राजीव सावंत, समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. कुलदीप रामटेके, समर्थ कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. संतोष घुले,प्रशासकीय अधिकारी प्रा. प्रदीप गाडेकर, क्रीडा संचालक प्रा. हरिश्चंद्र नरसुडे तसेच विविध महाविद्यालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

कुस्ती स्पर्धा निकाल-
एकूण स्पर्धक : ६२
५७ किलो : विजेता – वेदांत देवरे (एच. एच. जे. बी. पॉलिटेक्निक, नाशिक)
६१ किलो : विजेता –प्रवीण गुजरे (श्रीराम इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी पॉलीटेक्निक, सोलापूर)
६५ किलो : विजेता – राज पाटील( संजय एज्युकेशन सोसायटी पॉलिटेक्निक, धुळे)
७० किलो : विजेते –सिद्धार्थ वाघ (डोरे पॉलीटेक्निक, धुळे)
७४ किलो : विजेता – प्रज्वल कदम( जे.ए.आर.एस.एच. इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च सेंटर पॉलीटेक्निक विटा,सांगली)
८६ किलो : विजेता – प्रतीक शिंदे (सोनिया गांधी पॉलिटेक्निक, श्रीगोंदा)
९७ किलो : विजेता – गौरव खरचे(इंदिरा गांधी पॉलिटेक्निक,श्रीगोंदा)
१२५ किलो : विजेता – हर्षवर्धन गांगर्डे (सोनिया गांधी पॉलीटेक्निक, श्रीगोंदा)
वेटलिफ्टिंग स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे:-
एकूण स्पर्धक : ५४
५६ किलो : -प्रथम – ओम मोरे (जयहिंद पॉलिटेक्निक, कुरण) द्वितीय – जयान शेख (जे.पी. पॉलिटेक्निक, औरंगाबाद)
६२ किलो : प्रथम – ओंकार शिंदे (राजीव गांधी पॉलिटेक्निक, लातूर) द्वितीय – रुद्र पोद्दार (न्यू इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजि पॉलिटेक्निक, कोल्हापूर)
६९ किलो : प्रथम – श्रीराज बोडके(के. जे. सोमय्या पॉलिटेक्निक, मुंबई)
द्वितीय – वेदांत गायकवाड (श्रीमती गीता डी. तटकरे पॉलिटेक्निक)
७७ किलो : प्रथम – सुजल मोरे (डॉ. डी वाय पाटील पॉलिटेक्निक,कोल्हापूर) द्वितीय – ऋषिकेश अहिरे(सौ. शांतीदेवी चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी पॉलीटेक्निक चाळीसगाव)
८५ किलो : प्रथम –तेजस विरकर ( श्रीमती. गीता डी. तटकरे पॉलिटेक्निक कोलाड) द्वितीय – कुणाल चासकर (जयहिंद पॉलिटेक्निक कुरण,जुन्नर)
९४ किलो : प्रथम – विनायक खेडकर (सोनिया गांधी पॉलिटेक्निक श्रीगोंदा)द्वितीय – श्रेयस पांगरे( ऑल इंडिया श्री. शिवाजी मेमोरियल सोसायटीज पॉलिटेक्निक, पुणे)
१०५ किलो : प्रथम – करण ठोंबरे (भिवराबाई सावंत पॉलिटेक्निक पुणे) द्वितीय – फिरोज फेज(अंजुमन इस्लाम पॉलिटेक्निक, मुंबई)
१०५+ किलो : प्रथम – अथर्व तायडे (गव्हर्नमेंट पॉलीटेक्निक, नागपूर) द्वितीय –शिवम वाकळे (ग्रामीण टेक्निकल अँड मॅनेजमेंट कॅम्पस पॉलीटेक्निक नांदेड)

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल डॉ.सचिन भालेकर,क्रीडा शिक्षक सुरेश काकडे, विनायक वऱ्हाडी, तसेच राहुल अहिरे आयोजकांचे सर्वत्र कौतुक करण्यात आले. खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत क्रीडास्पर्धेचा उत्साह द्विगुणित केला. विजेत्या व सहभागी सर्व खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.

fb img 1771121534243

Related posts

पंचनामा विशेष – आठवणीतील माणसे…

Chief Editor

एक्साईड दिक्षा फाउंडेशन, दिल्ली तर्फे समर्थ आय.टी.आय मधील विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप’ प्रदान !!

Chief Editor

जवळे (ता.आंबेगाव) येथे उत्साहात संपन्न झाला शिवजयंती सोहळा !!

Chief Editor

Leave a Comment