
पंचनामा लोणी (धामणी)प्रतिनिधी – काल संपूर्ण देशभरात शिवजयंती उत्साहात संपन्न झाली.ग्रामीण भागात देखील छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात संपन्न करण्यात आली.

शिरदाळे (ता.आंबेगाव) येथे लहान मुलांनी एकत्र येत शिवजयंती साजरी केली.त्यांचे यंदाचे हे दुसरे वर्ष होते.सकाळी सर्व लहान मुलांनी एकत्र येत छोटा मंडप तयार केला.त्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली.सकाळी सामुहिक आरती घेण्यात आली.त्यांनतर सर्वांनी गावातून वर्गणी जमा केली.ग्रामस्थांनी देखील त्यांना चांगला प्रतिसाद दिला.दिवसभर मुलांची लगबग सुरूच होती.

सायंकाळी श्री.बाळासाहेब रणपिसे यांनी आपल्या ट्रैक्टर मिरवणुकीसाठी उपलब्ध करून दिला.सायंकाळी सात वाजता गावातून मिरवणूक काढण्यात आली.यावेळी मुलांनी वेगवेगळी वेशभूषा करून मिरवणुकीत रंगत आणली होती.

गावच्या मुख्य चौकात हनुमान मंदिर पटांगणात मिरवणुकीची सांगता करण्यात आली.त्यानंतर सर्वांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.

गावातील लहान मुलांनी एकत्र येत साजरी केलेली शिवजयंती त्याला ग्रामस्थांचा प्रतिसाद यामुळे सायंकाळी गावतले वातावरण शिवमय झाले होते.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ओम रणपिसे,ऋत्विक सरडे,वरद तांबे,शिवम रणपिसे,ऋषभ सरडे,तेजस मिंडे,नचिकेत तांबे,तनिष्का रणपिसे,तनुजा मिंडे,केतकी तांबे,रिद्धी तांबे,कणीक्षा तांबे यांचा सहभाग होता.

छत्रपतींबद्दल असलेल्या आदराचे आणि अभिमानाचे प्रतीक या बालाचमूनच्या या कार्यातून अधिक गडद झाले तर महाराजांची प्रत्येक गोष्ट येणाऱ्या पिढीला अधिक चालना देणारी आहे हे यातून स्पष्ट झाले. मा.उपसरपंच मयुर सरडे यांनी ग्रामस्थांना या कार्यक्रमासाठी देणगी देण्याचे आवाहन केले होते त्याला ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद देत देणगी जमा केली तर अनिकेत चौधरी,संकेत तांबे,कल्पेश सरडे,भुपेंद्र तांबे,कुणाल तांबे,सोमनाथ तांब,श्रीनाथ तांबे,शुभम तांबे यांनी या लहान चमुन्ना प्रोत्साहन दिले.यातून हा कार्यक्रम यशस्वी संपन्न झाला.


