सामाजिक

जवळे (ता.आंबेगाव) येथे उत्साहात संपन्न झाला शिवजयंती सोहळा !!

img 20260220 wa0112

पंचनामा पारगाव (शिंगवे) प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील सर्वार्थाने प्रगतशील गाव म्हणून ओळख असणाऱ्या व ग्रामपंचायतच्या माध्यमातून विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात अग्रेसर असणाऱ्या जवळे या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये शिवजयंती सोहळा साजरा करण्यात आला.

img 20260220 wa0112

शिवशंभो प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून शिवजोत शिवनेरी वरून घेऊन येण्याचे कार्य श्री अमोल शिंदे,पंढरी टाव्हरे,उत्तम शिंदे पाटील, तुषार टाव्हरे, निलेश गायकवाड, प्रसाद ताजने, निरंजन शिंदे,गणेश वाळुंज, गणेश शिंदे, राहुल गावडे,अभिजित शिंदे, वरद गावडे, प्रेम गायकवाड, गणेश टाव्हरे, सौरभ शिंदे,शुभम शेळके, सिद्धार्थ शिंदे यांनी केले.

शिवज्योतीची भव्य मिरवणूक गावामधून काढली नंतर उपस्थिती महिला, ग्रामस्थ, व प्रतिष्ठान चे सर्व सभासद यांनी महाराजांचे पूजन केले.

img 20260220 wa0110

कार्यक्रम स्थळी रांगोळीच्या माध्यमातून महाराजांची प्रतिमा तयार करण्यात आली होती या कार्यक्रमासाठी बाल चमू विविध वेशभूषा परिधान करून आले होते त्यांनीही सर्वांचे लक्ष वेधले. कार्यक्रम झाल्यावर सर्वांनाच अल्प उपहार देण्यात आला.

या कार्यक्रमासाठी महिला भगिनी,लहान मुले, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते अशी माहिती पंढरीनाथ टाव्हरे व उत्तम शिंदे पाटील यांनी दिली.

fb img 1771121534243

Related posts

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते जेजुरी येथे वारकऱ्यांना हायजिनिक किटचे वाटप !!

Chief Editor

पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध !!

Chief Editor

“उंचखडक येथील मुळे भावंडांनी गौरवग्रंथ आणि अभिष्टचिंतन सोहळ्यातून जागवल्या आईच्या आठवणी” !!

Chief Editor

Leave a Comment