सामाजिक

चिमुकल्यांच्या उत्साही प्रवेशाने गजबजल्या शाळेच्या वर्गखोल्या !!

1009834422

पंचनामा प्रतिनिधी -समीर गोरडे

अवसरी बुद्रुक येथील अध्यक्ष चषक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा पहिला दिवस !! हा दिवस प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील एक अत्यंत उत्साहाचा नवीन आठवणींचा आणि नवीन उत्सुकतेचा दिवस असतो.नवीन गणवेश,नवीन दप्तर, वह्या,पुस्तके आणि मित्र मैत्रिणीना भेटण्याची ओढ या सगळ्या गोष्टी दिवसाच्या खास बनवतात.

शाळेच्या पहिल्या दिवशी ट्रॅक्टर मधून मुलांची गावातून ढोल ताशाच्या गजरात प्रभात फेरी काढण्यात आली.

शाळेतील शिक्षकांनी आणि ग्रामस्थांनी मुलांना औक्षवण करून गुलाब पुष्प दिले.शाळेतील मुलांना मोफत पाठ्यपुस्तक दप्तर शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप जिल्हा परिषद सदस्य विष्णू काका हिंगे यांच्या शुभहस्ते देण्यात आले.

अवसरी बुद्रुक ग्रामपंचायतीने एक नवीन उपक्रम राबवून शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला ग्रामपंचायतीच्या सौजन्याने एक फुलझाडे जिल्हा परिषद सदस्य विष्णू काका हिंगे,ग्रामसेवक मलघे मॅडम,सरपंच सारिका हिंगे,उपसरपंच अनिल हिंगे,ग्रामपंचायत सदस्य कल्याण हिंगे यांच्या हस्ते देण्यात आले अशी माहिती शाळेचे मुख्याध्यापक राम गुरव ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सागर हिंगे यांनी दिली.

1009828025
1009828034

Related posts

पोंदेवाडी (ता.आंबेगाव) येथील ट्रांसफार्मर गेला चोरीला !!

Chief Editor

विजेच्या लपंडावाचा व्यावसायिक आणि शेतकऱ्यांना ‘शॉक’ ; पारगाव परिसरातील अघोषित भारनियमनामुळे शेतकरी, व्यापारी व विद्यार्थ्यांची गैरसोय !!

Chief Editor

संत निरंकारी मिशन-राजेवाडी शाखेच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात ३७४ जणांनी केले मानवतेप्रती रक्तदान…

Chief Editor

Leave a Comment