सामाजिक

समर्थ फार्मसी विद्यार्थ्यांची पुण्यातील नामांकित कंपनीत घवघवीत भरारी ;सिलिकंट प्रा. लि. मध्ये २६ विद्यार्थ्यांची निवड !!

img 20260616 wa0413
1009829959

पंचनामा प्रतिनिधी – समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी व समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी, बेल्हे,या औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा आणखी एक मानबिंदू निर्माण केला आहे. पुणे येथील नामांकित औषधनिर्माण क्षेत्रातील कंपनी सिलिकंट प्रा. लि. (Cilicant Pvt. Ltd.) मध्ये महाविद्यालयातील तब्बल २६ विद्यार्थ्यांची कॅम्पस मुलाखतीद्वारे निवड झाली असून, या अभूतपूर्व यशामुळे संपूर्ण समर्थ परिवारात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

विद्यार्थ्यांनी आपल्या अथक परिश्रम, जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि कौशल्यांच्या बळावर हे यश संपादन केले आहे. या निवडीमुळे विद्यार्थ्यांच्या करिअरला नवी दिशा मिळणार असून समर्थ संस्थेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची आणि उद्योगाभिमुख प्रशिक्षणाची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये आरती मालकापूरे, नंदिनी शिंदे, साक्षी गाडगे, सायली पानमंद, अस्मिता हुलवळे, निशा कुरकुटे, सीमा घोडे, नेहा भोर, कौतिकाबाई पुयाड, आरती वाघमारे, सिद्धी कारंडे, आकांक्षा म्हस्के, ईश्वरी बोऱ्हाडे,ऋतुजा घाडगे, कोमल वाघमारे, पायल खताळ, पूजा गायकर, अलीशा सय्यद, अवंतिका गावडे, सलोनी कुर्हे, आकांक्षा चौधरी, आकांक्षा वाळुंज, निकिता गलांडे, सोनिया घुले, कल्याणी बनकर आणि वैष्णवी वाव्हळ यांचा समावेश आहे.

या यशामागे महाविद्यालयाच्या प्रशिक्षण व नियुक्ती विभागाचे (T&P Cell) डॉ.बिपीन गांधी,डॉ.सागर तांबे,प्रा.सचिन पोखरकर यांचे विशेष योगदान असून, विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विभागाने केलेले सातत्यपूर्ण प्रयत्न, समन्वय, मार्गदर्शन आणि पाठपुरावा यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके, मा.जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके, कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. कुलदीप रामटेके आणि समर्थ कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य प्रा. संतोष घुले प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर तसेच संकुलातील सर्व विभागाचे प्राचार्य,विभागप्रमुख,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

विद्यार्थ्यांच्या या उज्ज्वल यशामुळे समर्थ शैक्षणिक संकुलाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, भविष्यातही अशाच यशस्वी वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

1009828026
1009760330

Related posts

कळमोडी धरण १००% भरले; आरळा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा !!

Chief Editor

एस.आय.आर कार्यक्रमाचा केंद्रीय उपनिवडणूक आयुक्तांकडून आढावा

Chief Editor

आयुक्त तुकाराम मुंढे यांचा पहिल्याच दिवशी महाराष्ट्रभर कारवाईचा धडाका; सलग दुसऱ्या दिवशी कारवाई, फळ व्यापारी, खवा, तुप उत्पादक निशान्यावर !!

Chief Editor

Leave a Comment