सामाजिक

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जारकरवाडी येथे उत्साहात संपन्न झाला शिक्षक दिन !!

1010858383
1010858383

जारकरवाडी, प्रतिनिधी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जारकरवाडी येथे भारताचे माजी राष्ट्रपती व महान शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

या विशेष उपक्रमामध्ये इयत्ता सातवीतील मुले व मुलींनी शिक्षकांची भूमिका उत्साहाने पार पाडली. शाळेचे मुख्याध्यापक म्हणून प्रथमेश धानापुणे यांनी कामकाज पाहिले, तर उपमुख्याध्यापकपदाची जबाबदारी श्रेया कुसळ व स्वरा ढोबळे यांनी सांभाळली.

सातवीतील सर्व विद्यार्थ्यांनी दिवसभर शिक्षकांची भूमिका निभावत सकाळच्या परिपाठापासून शालेय कामकाजात सक्रिय सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत विविध विषयांचे तास घेऊन लहान विद्यार्थ्यांना ज्ञानदान केले. शिक्षकाची जबाबदारी, विद्यार्थ्यांना शिकवताना येणारी आव्हाने आणि अध्यापनाचे महत्त्व याचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना या उपक्रमातून मिळाला.

1010858365

यावेळी श्री. रासकर सर यांनी शिक्षक दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे एक आदर्श शिक्षक, तत्त्वज्ञ आणि शिक्षणप्रेमी होते. त्यांच्या जन्मदिवसानिमित्त दरवर्षी ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो, अशी माहिती त्यांनी दिली.

शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या जीवनाला योग्य दिशा देणारा मार्गदर्शक असून ज्ञान, संस्कार आणि मूल्यांची शिकवण देऊन विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्यात शिक्षकांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

1010858233

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षकांविषयी आदराची भावना निर्माण झाली असून शिक्षकाची भूमिका आणि जबाबदारी प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी मिळाली. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जारकरवाडी येथील शिक्षक दिनाचा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी व संस्मरणीय ठरला.

92f4d25e 9686 4a0e aeae dca8fbad0e88 1 all 379001

Related posts

लावणी सम्राज्ञीच्या घुंगरांचा नाद पुन्हा घुमला… कलावंत शांताबाई च्या पुनर्वसनाला व अरुण खरात यांच्या पाठपुराव्याला जून 2026 ला तीन वर्ष पूर्ण

Chief Editor

समर्थ कॉलेजमध्ये ड्रोन वर्कशॉप व ड्रोन स्पर्धा उत्साहात संपन्न !!

Chief Editor

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पंढरपुरात सुविधांची पाहणी;दर्शन रांगेत पाणी बॉटलचे वाटप; चंद्रभागेत होडीतून स्वच्छतेची पाहणी, आयसीयूमधील रुग्णांची विचारपूस !!

Chief Editor

Leave a Comment