सामाजिक

आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची २३५ वी जयंती पारगाव (शिंगवे) येथे उत्साहात साजरी !!

1010855862

पारगाव (शिंगवे) : आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची २३५ वी जयंती पारगाव (शिंगवे) येथे मोठ्या उत्साहात व विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांनी साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमास उमाजी नाईक मंडळाचे सर्व कार्यकर्ते, चव्हाण-पाटील बैलगाडा संघटनेचे सर्व कार्यकर्ते, महिला बचत गटाच्या सर्व महिला तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जयंतीनिमित्त शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये बक्षीस प्राप्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

या वेळी शरद सहकारी बँकेचे दौलतराव लोखंडे, पंचायत समिती सदस्या श्वेता ढोबळे, माजी उपसरपंच विठ्ठल ढोबळे, ग्रामपंचायत सदस्य किरण ढोबळे, काळूराम लोखंडे, बाळासाहेब ढोबळे, दत्ताराम वैद, वीरेंद्र ढोबळे, रंगनाथ चव्हाण, संतोष चव्हाण, संतोष ढोबळे, विवेक चव्हाण, गणेश चव्हाण, बाबाजी चव्हाण, रामा रोडे, नामदेव रोडे, शंकर चव्हाण, संतोष चव्हाण, रामदास चव्हाण, राहुल गफले, अनिकेत गावडे, अनिकेत ढोबळे, सुनील चांगण, सचिन देवडे, बजरंग देवडे, वैभव वाव्हळ, सचिन दातखिळे, इंद्रायणी चव्हाण, ललिता चव्हाण, भाग्यश्री चव्हाण, रेश्मा चव्हाण, छाया रोडे, सायली रोडे, वर्षा रोडे, साधना रोडे, जनाबाई चव्हाण आदी महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.

1010855862

आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या शौर्यपूर्ण व प्रेरणादायी कार्याचे स्मरण करून त्यांच्या विचारांचा आदर्श नव्या पिढीने घ्यावा, असा संदेश यावेळी उपस्थितांनी दिला. पारगाव (शिंगवे) येथे जयंतीनिमित्त आयोजित विविध उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

92f4d25e 9686 4a0e aeae dca8fbad0e88 1 all 379001

Related posts

महागाईचा मोठा झटका, गॅस सिलिंडरच्या दरात पुन्हा वाढ;सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले !!

Chief Editor

तंबूतल्या तमाशाला डिजिटल रूप देणारा निस्वार्थी अवलिया – अनिल रामचंद्र बनसोडे

Chief Editor

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते जेजुरी येथे वारकऱ्यांना हायजिनिक किटचे वाटप !!

Chief Editor

Leave a Comment