सामाजिक

समर्थ गुरुकुलमध्ये दहीहंडी उत्साहात साजरी !!

1010856765
1010856765

राधा-कृष्ण व गोपाळांच्या वेशभूषेने रंगला सोहळा; विद्यार्थ्यांनी घेतला दहीहंडी फोडण्याचा आनंद !!

पंचनामा प्रतिनिधी – समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ गुरुकुल, बेल्हे या सीबीएसई मान्यताप्राप्त इंग्रजी माध्यमाच्या शाळेत श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने दहीहंडी उत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या वेळी विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा, नृत्य आणि दहीहंडी फोडण्याच्या उपक्रमातून श्रीकृष्ण जन्माष्टमीचा आनंद द्विगुणित केला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी नर्सरी, ज्युनिअर केजी व सिनियर केजीच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी राधा-कृष्ण तसेच गोपाळांच्या वेशभूषेत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. या विद्यार्थ्यांनी विविध गाण्यांवर आकर्षक नृत्य सादर करून कार्यक्रमात उत्साह निर्माण केला. चिमुकल्यांच्या निरागस वेशभूषेने आणि नृत्याने संपूर्ण वातावरण भक्तिमय व आनंदमय झाले.

इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी दहीहंडी फोडण्याचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत दहीहंडी फोडण्याचा आनंद लुटला. मुलांसोबत मुलींनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती, परंपरा आणि सणांचे महत्त्व अनुभवातून समजण्याची संधी मिळाली.

कार्यक्रमाच्या निमित्ताने श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे पूजन समर्थ ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या वैशाली आहेर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सौ. वैशाली सहाणे यांनी विद्यार्थ्यांना गोकुळाष्टमीचे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व सांगितले. श्रीकृष्णाच्या बाललीला, दहीहंडीची परंपरा आणि या उत्सवामागील सांस्कृतिक मूल्यांची माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना दिली.

दहीहंडी उत्सवाचे संपूर्ण नियोजन प्राचार्य सतीश कु-हे व क्रीडा संचालक हरिश्चंद्र नरसुडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ. शीतल पाडेकर यांनी केले. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग, पारंपरिक वेशभूषा, नृत्य सादरीकरण आणि दहीहंडी फोडण्याच्या आनंदामुळे समर्थ गुरुकुलमध्ये दहीहंडी उत्सव अविस्मरणीय ठरला.

92f4d25e 9686 4a0e aeae dca8fbad0e88 1 all 378997
1010806600

Related posts

वडगावपीर येथील राजगुडे वस्ती वर बंद असलेल्या घरावर चोरट्यांचा डल्ला!!

Chief Editor

लोककलावंतांचा वारंवार होणारा अपमान थांबला पाहिजे;पद्मश्री रघुवीर खेडकर यांच्या नाराजी मागील वेदना समजून घेण्याची गरज !!

Chief Editor

चिमुकल्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शैक्षणिक साहित्य वाटप !!

Chief Editor

Leave a Comment