
पंचनामा प्रतिनिधी – मांदळेवाडी ( ता.आंबेगाव ) येथे गेले काही दिवस विजेच्या लपंडावामूळे ग्रामस्थांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
या संदर्भात समजलेली माहिती अशी कि,मांदळेवाडी येथे शिरूर तालुक्यातून रांजणगाव येथून विजपुरवठा केला जातो. हा विजपूरवठा कान्हूर मेसाई येथील उपकेद्रात येतो व पुढे ढगेवाडी मार्गे मांदळेवाडी येथे विजपुरवठा केला जातो.म्हणजेच शिरूर तालुक्यातून विजपुरवठा केला जातो.त्यामुळे येथील विजकर्मचारी मनमानेल तसा कारभार करतात.
रविवार( दि.२४) ते बुधवार (दि.२७) अरे चार दिवस बारा ते वीस तास भारनियमन होत असल्याने ग्रामस्थ अक्षरशा वैतागले आहेत.सध्या मांदळेवाडी येथे दररोज सायंकाळी सहा ते रात्री दहा असे चार तास भारनियमन असताना हेच भारनियमन विजवितरण कंपनीने वाढवून गेली चार दिवस बारा ते वीस तास झाल्याने नागरीकांचे मोठे हाल होताना दिसतात.
या विजवितरण कंपनीच्या भोगळ भारनियमनामुळे विशेषता जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचे खूप हाल होतात असे येथील दूधउत्पाक शेतकरी संभाजी आदक,हनुमान आदक, पोपट आदक, दिलीप गोरडे यांनी सांगितले.
विशेष म्हणजे या विजेच्या लंपडावामुळे जर विज कर्मचारी किंवा अधिकारी यांच्याशी संपर्क साधला तर ते अतिशय उर्मटपणे उत्तरे देतात शिवाय भारनियमन संदर्भात कुठल्याच राजकीय पुढार्यांची मदत मिळत नाही हि मोठी खेदाची गोष्ट आहे.आणि त्यामध्ये शिरूर तालूक्यातील कर्मचारी व अधिकार्यांची बनवेगिरी त्यापुळे मांदळेवाडी येथील ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून एक तर विज घायची असेल तर वेळेवर द्या,भारनियमना मध्ये बदल करा नहितर कायमची विज बंद करा अशा तिखट प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
या संदर्भातील माहिती अशी कि शिरूर तालुक्यातून आंबेगाव तालुक्यातील मांदळेवाडी या ठिकाणी वीज पुरवठा केला जातो.तसा पुरवठा ढगेवाडी व कान्हूर मेसाईला हि केला जातो. मात्र तेथे विज जात नाही.मग मांदळेवाडी येथील विजेच का झटके मारते याचे उत्तर फक्त तेथील कर्मचारीच देऊ शकतात.शिवाय मांदळेवाडी येथे दररोज सायंकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत भारनियमन असते.ते मात्र बदले जात नाही.यापूढे जर मांदळेवाडी ग्रामस्थांना विजेचा मनस्ताप झाला तर पाबळ उपविजकेंद्रावर ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा संतप्त इशारा सरपंच उज्वला आदक, उपसरपंच रवि ढगे पाटील, उद्योजिका ज्योती गोरडे व ग्रामस्थांनी दिली आहे.


