सामाजिक

धामणी ग्रामपंचायतीत १५% मागासवर्गीय निधीतून खुर्ची व स्पीकर सेट वाटप !!

img 20260330 wa0543

पंचनामा प्रतिनिधी – धामणी ग्रामपंचायतीमार्फत मागासवर्गीय घटकांच्या विकासासाठी राखीव असलेल्या १५% निधीतून गावातील सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांना चालना देण्यासाठी खुर्च्या व स्पीकर सेटचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत कार्यालयात करण्यात आले होते.

लाभार्थ्यांना आवश्यक साहित्य देऊन त्यांच्या उपक्रमांना प्रोत्साहन देण्याचा उद्देश या योजनेमागे असल्याचे ग्रामपंचायतीच्या वतीने सांगण्यात आले.

सरपंचांनी आपल्या भाषणात सांगितले की, “मागासवर्गीय समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून मिळणारा निधी योग्य ठिकाणी व पारदर्शक पद्धतीने वापरणे ही आमची जबाबदारी आहे. या माध्यमातून समाजातील शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांना बळ मिळेल.”

fb img 1773887068819

लाभार्थ्यांनी ग्रामपंचायतीचे आभार मानत सांगितले की, या साहित्यामुळे गावातील कार्यक्रम अधिक प्रभावीपणे आयोजित करता येतील.
या उपक्रमामुळे गावात सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, ग्रामपंचायतीच्या या निर्णयाचे सर्व स्तरांतून स्वागत करण्यात येत आहे.

यावेळी मा.पंचायत समिती सदस्य रविंद्र करंजखेले सरपंच अक्षयराजे विधाटे , मा.उपसरपंच सुनिलदादा जाधव , संतोष करंजखेले, मा.सरपंच अंकुश भुमकर , महेश भुमकर, ग्रामपंचायत सदस्या सुवर्णा रोडे , शालन पंचरास ,विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक सुधाकर जाधव , सतीश पंचरास , दिलीप पंचरस , सचिन ससाणे,आकाश जाधव , रघुनाथ जाधव ,बाळासाहेब पंचरास , संतोष पंचरास ,शांताराम पंचरास ,रुपेश विधाटे , खुशाल जाधव ,सिताराम जाधव ,अमोल जाधव ,विशाल जाधव ,दत्तात्रेय जाधव ,सुखदेव जाधव ,निलेश करंजखेले ,हरिश्चंद्र गवंडी , आष्पाक इनामदार , ज्ञानेश्वर जाधव आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Related posts

राज्यात साखर उत्पादन १० लाख टनांनी घटणार; उत्पादन १०० लाख टनांवर स्थिरावण्याची शक्यता !!

Chief Editor

महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार यांची जयंती ग्रामपंचायत जवळे येथे संपन्न..

Chief Editor

मागील पाच वर्षांत टँकरद्वारे पाणीपुरवठा झालेल्या गावांचा जलयुक्त शिवार ३.० मध्ये प्राधान्य मिळणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Chief Editor

Leave a Comment