सामाजिक
img 20260330 wa0671

एक्साईड दिक्षा फाउंडेशन, दिल्ली तर्फे समर्थ आय.टी.आय मधील विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप’ प्रदान !!

img 20260330 wa0671


पंचनामा प्रतिनिधी – एक्साइड इंडस्ट्रिस लिमिटेड यांच्या सामाजिक दायित्व (CSR) उपक्रमांतर्गत ‘ एक्साईड दिक्षा स्कॉलरशिप’ योजनेंतर्गत समर्थ आय.टी.आय,बेल्हे येथील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.
या उपक्रमांतर्गत इलेक्ट्रिशियन व फिटर या ट्रेडमधील एकूण १२ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून प्रत्येक विद्यार्थ्याला रु.४५,००० इतकी शिष्यवृत्ती देण्यात येत आहे.या शिष्यवृत्तीमुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक खर्च भागविण्यास तसेच कौशल्य विकासासाठी प्रोत्साहन मिळणार आहे.
इलेक्ट्रिशियन ट्रेडमधून साहिल शिवाजी पावडे,साहिल सुरेश पावडे,आयुष अमित जाधव,गणेश बाबा आदक,सोहम अशोक शिंगाडे,विनोद तुकाराम जाधव,साहिल सूर्यकांत घोलप व कुणाल सचिन गाडगे या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.तसेच फिटर ट्रेडमधून आदित्य कचरू राजापूरे,प्रदीप मच्छिंद्र मथे,शुभम भारत सरोदे आणि जशेश खंडू शिंदे यांचा समावेशआहे.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,जिल्हा परिषद माजी सदस्या स्नेहलताई शेळके,कॅम्पस डायरेक्टर राजीव सावंत प्राचार्य पांडुरंग हाडवळे,उपप्राचार्य विष्णू मापारी तसेच सहकार्य करणारे शिक्षक नवाब शेख आणि निकेश औटी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

fb img 1773887068819

Related posts

समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगमध्ये जागतिक परिचारिका दिन उत्साहात साजरा !!

Chief Editor

धामणीत अष्टगंधउटी फळ महोत्सव उत्साहात;खंडोबा देवस्थानाचा उपक्रम;सुगंधी फुलाची नयनरम्य आरास !!

Chief Editor

समर्थ लॉ कॉलेजची यशस्वी निकालाची गौरवशाली परंपरा कायम;विधी शिक्षणाच्या क्षेत्रात समर्थ लॉ कॉलेजचे दैदिप्यमान यश !!

Chief Editor

Leave a Comment