सामाजिक

वारकऱ्याच्या मदतीला धावले पुणे वाहतूक पोलिसांचे डीसीपी; प्रसंगावधानाने वाचवले प्राण !!

1010128439
1010128439

पंचनामा प्रतिनिधी – पुणे शहरात जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे भक्तिमय वातावरणात उत्साहाने स्वागत करण्यात येत आहे. लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत प्रशासनाकडून चोख सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे.

याच दरम्यान एक हृदयस्पर्शी घटना घडली. वाहतूक व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत असताना पुणे शहर वाहतूक शाखेचे डी.सी.पी.संदीप भाजीभाकरे यांच्या समोर एका वारकऱ्याला अचानक फिट आली आणि तो रस्त्यावर कोसळला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखत त्यांनी क्षणाचाही विलंब न करता त्या वारकऱ्याच्या मदतीसाठी धाव घेतली. तातडीने प्रथमोपचार आणि आवश्यक मदत मिळाल्यामुळे वारकऱ्याचे प्राण वाचले.

या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, अनेक नागरिक “वारकऱ्याच्या मदतीला साक्षात विठ्ठलच धावून आला” अशा भावना व्यक्त करत डी.सी.पी संदीप भाजीभाकरे यांच्या तत्परतेचे आणि मानवतेचे कौतुक करत आहेत.
मानवता, कर्तव्यदक्षता आणि संवेदनशीलतेचा हा प्रसंग अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Related posts

आरोग्य, शिस्त आणि सकारात्मक जीवनशैलीस समर्पित संत निरंकारी मिशनचा घोडेगाव सह आळेफाटा, मंचर, जुन्नर, नारायणगाव मध्ये योग दिन उत्साहात संपन्न !!

Chief Editor

आंबेगाव तालुक्यातील खडकवाडी येथील माध्यमिक विद्यालयाला “मोरडे फूड प्रॉडक्ट्सचे” संस्थापक मा. श्री. हर्षल मोरडे यांच्या वतीने पाच संगणक संच उपलब्ध !!

Chief Editor

३० जूनपर्यंत HSRP नंबर प्लेट बसवा; १ जुलैपासून नियमभंग करणाऱ्यांवर पोलिस आणि परिवहन अधिकाऱ्यांकडून कडक कारवाई !!

Chief Editor

Leave a Comment