सामाजिक

पालखीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ५७ हिरकणी कक्ष- उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद खंडागळे

1010128599

दोन वर्षे पर्यतच्या बालकांसाठी बाळकृष्ण कोपरा व खेळणी संच !!

पंचनामा प्रतिनिधी – संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराज महाराज पालखीच्या पार्श्वभूमीवर गरोदर व स्तनदा माता आणि लहान बालकांकरिता पुणे जिल्ह्यात एकूण ५७ हिरकणी कक्ष उभारण्यात आले असून याकरिता ७ बालविकास प्रक्लप अधिकारी, ५७ अंगणवाडी पर्यवेक्षिका, १९८ गणवाडी सेविकांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद खंडागळे यांनी दिली.

या हिरकणीकक्षाअंतर्गत २ वर्षे पर्यतच्या बालकांसाठी बाळकृष्ण कोपरामध्ये राजगिरा, शेंगदाणा, मुरमुऱ्याचे लाडु फुटाणे, फळे, बिस्किट, ओरआरएस, ग्लुकॉन डी, खाऊ ठेवण्यासाठी बरण्या, कागदी डिश आदी, खेळणी संचामध्ये बॅट बॉल. खुळखुळा. बाहुली. मोठा बॉल व लहान मुलांची इतर आवश्यक खेळणी आदी, गरोदर व स्तनदा मातांना अल्हाददायी वातावरणासाठी बेड, गाद्या, बेडशीट. उश्या. उशीचे कव्हर, पार्टिशन साठी मोठे पडदे आणि नॅपकीन, प्रथमोपचार पेटी, पिण्याच्या पाण्याचे जार व ग्लास व सॅनेटरी पॅड या सुविधा आहेत.

पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या गरोदर व स्तनदा माता आणि लहान बालकांना हिरकणी कक्षांची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असून या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. खंडागळे यांनी केले आहे.

1009850407

Related posts

अवसरी बुद्रुक येथे भव्य कृषी मेळावा व चर्चासत्र उत्साहात संपन्न !!

Chief Editor

धामणी (लोणी) येथे उत्साहात संपन्न झाला प्रभू रामजन्म सोहळा !!

Chief Editor

समर्थ मध्ये तीन दिवसीय ताण-तणाव व्यवस्थापन व व्यसनमुक्ती कार्यशाळा संपन्न !!

Chief Editor

Leave a Comment