सामाजिक

संत निरंकारी मिशन मार्फत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत व्यापक स्वच्छता अभियान…

1010135227
1010135230

पंचनामा प्रतिनिधी – आळंदी (पुणे): ९ जुलै २०२६ रोजी आषाढी वारीनिमित्त श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत संत निरंकारी मिशनच्या माध्यमातून आळंदी ते बोपखेल पर्यंतच्या दोन्ही पालखी मार्गावर व्यापक साफ-सफाई, स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

निरंकारी सद्गुरू माता सुदीक्षा जी महाराज आणि राजपिता रमित जी यांच्या प्रेरणेने आणि “स्वच्छता ही सेवा” या मानवकल्याणाच्या संदेशाला अनुसरून आयोजित करण्यात आलेल्या या अभियानात मिशनचे शेकडो सेवादल , स्वयंसेवक तसेच महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उत्साहाने सहभागी झाले.

1010135228

पालखी मार्गावरील रस्ते, पदपथ, सार्वजनिक ठिकाणे, बसथांबे तसेच परिसरातील कचरा संकलित करून स्वच्छता करण्यात आली. भाविकांना स्वच्छ, सुरक्षित व आनंददायी वातावरण उपलब्ध व्हावे, तसेच पर्यावरण संरक्षणाचा संदेश समाजापर्यंत पोहोचावा हा या अभियानाचा प्रमुख उद्देश होता.

या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी संत निरंकारी मिशनच्या स्वयंसेवकांनी निःस्वार्थ भावनेने केलेल्या सेवाकार्याचे कौतुक केले. आध्यात्मिकतेसोबत सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेवून अशा उपक्रमांमुळे समाजात स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

1010135226

संत निरंकारी मिशन-पुणे झोनचे झोनल इंचार्ज श्री अशोक अहुजा यांनी सांगितले की, सेवा, प्रेम, सहअस्तित्व आणि मानवतेचा संदेश कृतीतून समाजापर्यंत पोहोचविणे हे मिशनचे ध्येय असून, रक्तदान, वृक्षारोपण, पर्यावरण संवर्धन, जलसंवर्धन आणि स्वच्छता अभियान यांसारखे विविध समाजोपयोगी उपक्रम देशभर सातत्याने राबविले जात आहेत.

या स्वच्छता अभियानाद्वारे संत निरंकारी मिशनने पुन्हा एकदा अध्यात्मासोबत सामाजिक बांधिलकी जपत “सेवा हीच खरी उपासना” हा संदेश कृतीतून अधोरेखित केला.

1009850407

Related posts

आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागात मोबाईल झालेत नॉट रिचेबल;पहाडदरा, शिरदाळे वडगावपीर,मांदळेवाडी ही गाव अनेक वर्षांपासून नेटवर्क पासून वंचित !!

Chief Editor

“जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भूगोल फाऊंडेशनकडून वृक्षारोपण आणि वृक्ष नामकरण (बारसे) सोहळा संपन्न” !!

Chief Editor

पॅरालिसिसचा झटका आलेला असतानाही त्यांनी… दिग्दर्शक प्रविण तरडेंनी उघड केला मोहन जोशींचा ‘तो’ थक्क करणारा थरार!

Chief Editor

Leave a Comment