सामाजिक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा’ माहितीपटाचा प्रीमियर !!

1010134427

पंचनामा प्रतिनिधी – माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि वॉर्नर ब्रदर डिस्कव्हरी वाहिनी संयुक्तपणे निर्मित ‘पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा’ या माहितीपटाचा आयनॉक्स चित्रपटगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रीमियर शो झाला.

या ‘प्रीमियर शो’साठी विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार प्रवीण दरेकर, आमदार निरंजन डावखरे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह, सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिव समृद्धी अनगोळकर, संचालक डॉ. किशोर गांगुर्डे, गोविंद अहंकारी, सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव अजय भोसले, उपसंचालक वर्षा आंधळे, आदी उपस्थित होते.

हा माहितीपट पंढरपूर वारीची प्रत्यक्ष अनुभूती देतो. या चित्रपटागृहामध्ये जणू काही पंढरपूरची वारी प्रत्यक्षात उतरली असल्याचेही अनुभव येत असल्याच्या भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या.

थोडक्यात माहितीपट
‘पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा’ हा २२ मिनिटांचा माहितीपट वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरी यांच्या सहकार्याने तयार करण्यात आला आहे. या माहितीपटाचे मराठी, इंग्रजी, हिंदी, तमिळ, तेलगु, बंगाली, कन्नड, मल्याळम या भाषांमध्ये डबिंग करुन त्याचे डिस्कव्हरीच्या विविध उपग्रह वाहिन्यांवरुन प्रसारण करण्यात येत आहे. विविध भाषांमधील या माहितीपटाचे प्रसारण डिस्कव्हरी, डिस्कव्हरी एचडी, टीएलसी, टीएलसी एचडी, अ‍ॅनिमल प्लॅनेट, अ‍ॅनिमल प्लॅनेट एचडी, इन्व्हेस्टिगेशन डिस्कव्हरी (आयडी), डिस्कव्हरी सायन्स, डिस्कव्हरी टर्बो अशा ९ वाहिन्यांवरुन करण्यात येत आहे.

1009850407

Related posts

लोणी,धामणी परिसरात महावितरणचे अघोषित भारनियमन ; बिबट्यांच्या वाढत्या वावरामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर !!

Chief Editor

मंचर–लोणी–शिरूर व राजगुरूनगर–पाबळ–लोणी शटल बस सेवेच्या मागणीची एसटी प्रशासनाकडून दखल !!

Chief Editor

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ;पुणे जिल्ह्यातील मावळ व खेड परिसरात ‘शुभ आरंभ’ उपक्रमातून उल्लेखनीय परिवर्तन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Chief Editor

Leave a Comment