सामाजिक

समर्थ पॉलिटेक्निक मध्ये ४० विद्यार्थ्यांची एल अँड टी प्रिसिजन इंजिनिअरिंग अँड सिस्टिम्समध्ये निवड !!

img 20260311 wa0749

पंचनामा प्रतिनिधी – समर्थ रुरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट संचलित समर्थ पॉलिटेक्निक,बेल्हे येथे नामांकित एल अँड टी प्रिसिजन इंजिनिअरिंग अँड सिस्टिम्स,तळेगाव या कंपनीचा ऑल कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह मोठ्या उत्साहात पार पडला.

या प्लेसमेंट ड्राइव्हला जुन्नर व संगमनेर तालुक्यातील विविध तंत्रनिकेतन महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या कॅम्पसमध्ये सुमारे १७० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यामध्ये जयहिंद पॉलिटेक्निक, कुरण,समर्थ पॉलिटेक्निक बेल्हे,फॅकल्टी ऑफ पॉलिटेक्निक अकोले या तंत्रनिकेतन महाविद्यालयांतील विद्यार्थी सहभागी झाले होते.कंपनीकडून विद्यार्थ्यांची अप्टिट्यूड टेस्ट व टेक्निकल इंटरव्ह्यू घेऊन अंतिम निवड प्रक्रिया पार पडली.

या निवड प्रक्रियेसाठी कंपनीकडून हरीश कोदरे (AGM), महेंद्र रटाटे (मॅनेजर), पुष्पराज मेंगडे (मॅनेजर), अक्षय बेल्हेकर (HR ऑफिसर) आणि राहुल पठारे (ऑफिसर) यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांची मुलाखत घेतली व संपूर्ण निवड प्रक्रिया पार पाडली.

समर्थ पॉलिटेक्निक, बेल्हे मधून चेतन इंदोरे, श्रीरंग आहेर, यश चिंचवडे, आदित्य लोंढे, नितेश दरेकर, प्रसाद गुंजाळ, साक्षी नाबगे, श्रावणी दारोटे, येतेश देशमुख, ज्ञानेश्वरी अदक, ज्ञानेश्वर रोकडे, विवेक कुरकुटे, ओमकार अदक, रुपेश लोखंडे, विवेक लोहकरे या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.त्याचप्रमाणे जयहिंद पॉलीटेक्निकच्या २२,अकोले पॉलिटेक्निक च्या ३ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,जिल्हा परिषद माजी सदस्या स्नेहलताई शेळके,कॅम्पस डायरेक्टर राजीव सावंत,समर्थ पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ.अनिल कपिले,उपप्राचार्य प्रा.संजय कंधारे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

प्लेसमेंट प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी समर्थ संकुलाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा.सचिन पोखरकर,समर्थ पॉलिटेक्निकचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट इन्चार्ज प्रा.संकेत विघे सर,अकॅडमिक कॉर्डिनेटर प्रा.श्याम फुलपगारे,डॉ.नंदकिशोर मुऱ्हेकर,मेकॅनिकल विभाग प्रमुख प्रा.महेंद्र खटाटे,इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभाग प्रमुख प्रा.आदिनाथ सातपुते,मेकॅट्रॉनिक्स विभाग प्रमुख प्रा.संदीप त्रिभुवन,इलेक्ट्रिकल विभाग प्रमुख प्रा.आशिष झाडोकार,कॉम्प्युटर विभाग प्रमुख प्रा.स्वप्नील नवले आदी प्राध्यापकांनी विशेष परिश्रम घेतले.

या कॅम्पस प्लेसमेंटमुळे नामांकित कंपनीत करिअरची संधी मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून संस्थेच्या उत्कृष्ट प्लेसमेंट परंपरेला पुन्हा एकदा उजाळा मिळाला आहे.

fb img 1771121541695

Related posts

समर्थ मध्ये तीन दिवसीय ताण-तणाव व्यवस्थापन व व्यसनमुक्ती कार्यशाळा संपन्न !!

Chief Editor

श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्ताने पारगाव (शिंगवे) येथे संपन्न झाले गुरूचरित्र पारायण, गृह पठण !!

Chief Editor

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जारकरवाडीच्या शिरपेचात मनाचा तुरा!!

Chief Editor

Leave a Comment