सामाजिक

वाणिज्य विभागाअंतर्गत तृतीय वर्ष वाणिज्य वर्गाचा इंटरशिप प्रोग्राम समारोप संपन्न !!

img 20260314 wa0296
img 20260314 wa0296

पंचनामा प्रतिनिधी – वाणिज्य विभागाअंतर्गत तृतीय वर्ष वाणिज्य वर्गाचा इंटरशिप प्रोग्राम समारोप दिनांक 13 मार्च 2026 या दिवशी भीमाशंकर सहकारी साखर कारखाना या ठिकाणी समारोपाचा कार्यक्रम झाला.

या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉ.नाथा मोकाटे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे पाटील,उपाध्यक्ष प्रदिप दादा वळसे पाटील,संचालक रामचंद्र ढोबळे,विलास लबडे,कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे,सेक्रेटरी रामनाथ हिंगे,चीफ अकौंटट राजेश वाकचौरे,ई डी पी मॅनेजर प्रमोद पाटील,पारगावचे माजी उपसरपंच विठ्ठल ढोबळे,कला विभागाचे विभाग प्रमुख प्रा.राहुल पडवळ व वाणिज्य विभागाचे विभाग प्रमुख प्रा.संतोष डोळस सर,प्रा.पूजा जाधव,प्रा.सपना औटी,प्रा.कुणाल वळसे व वाणिज्य विभागातील विद्यार्थी यांच्या उपस्थितीमध्ये हा समारोपाचा समारंभ संपन्न झाला.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाणिज्य विभाग प्रमुख राहुल डोळस सर आभार प्रदर्शन प्राध्यापक पूजा जाधव यांनी केले.तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.नाथा मोकाटे यांनी सदर इंटरशिप भीमाशंकर कारखान्याच्या सर्व विभागात जाऊन विद्यार्थ्यांनी माहिती घेतली याचा फायदा विद्यार्थ्यांना त्यांचा फायदा पुढील शैक्षणिक कामासाठी होईल असे प्राध्यापिका पुजा जाधव सांगितले.तसेच नोकरीसाठी आवश्यक होईल असे मत व्यक्त केले तसेच शरद सहकारी बँक पारगाव शाखा येथील शाखा अधिकारी सागर पडवळ यांनीही बँकिंक मधील अकौंट ओपनींग करणे,डीपोझीट तसेच इतर माहिती विद्यार्थ्यांना सांगितली.

fb img 1771121534243

Related posts

Chief Editor

धक्कादायक बातमी – वडगावपीर येथे अंत्यविधी साठी आलेल्या ग्रामस्थ, पाहूणे यांच्यावर आग्या मधमाशांचा हल्ला !!

Chief Editor

पारगाव (शिंगवे) येथे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा उत्साहात साजरा !!

Chief Editor

Leave a Comment