
पंचनामा विशेष – महाराष्ट्राची लोककला असलेल्या तमाशाला आधुनिकतेची जोड देत नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे मोठे कार्य करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे अनिल रामचंद्र बनसोडे !!!
वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षापासून त्यांनी आपले आई-वडील मंगला बनसोडे आणि रामचंद्र बनसोडे यांच्या सोबत तमाशा क्षेत्रात कार्य करण्यास सुरुवात केली.
पडद्यामागे राहून तमाशाच्या प्रत्येक अंगावर मेहनत घेणाऱ्या अनिल बनसोडे यांनी तमाशामध्ये अनेक नाविन्यपूर्ण प्रयोग राबवले. प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी स्टेजवर सर्वप्रथम विहिरीचे दृश्य उभे करणे वगनाट्य द्वारे . हेलीकाप्टर ,मिसाईल ,फॉर विलहर, दाखवले.१९९० साली सर्व प्रथम लाईट ड्रेस बनवला होता एका गीत साठी १६ फूट महादेव ची मूर्ती नृत्य तांडव करतना दाखवणे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या गाण्यांसाठी रंगमंचावर घोड्याची भव्य एंट्री घडवून आणणे, चांद्रयान ३ यशस्वी याची थीम ,दाखवली
क्रेनद्वारे एंट्री कलाकारांच्या प्रवेशाची संकल्पना राबवणे, तसेच पावसातील शॉवर डान्सची व्यवस्था तमाशामध्ये बसवणे यांसारखे वर अनेक आधुनिक ऐक्ट्रेटीवर प्रयोग त्यांनी यशस्वीपणे साकारले.
परंपरागत तंबूतल्या तमाशाला डिजिटल आणि आधुनिक स्वरूप देत आजच्या Gen-Z पिढीमध्येही तमाशाबद्दल कुतूहल निर्माण करण्याचे मोठे श्रेय त्यांना जाते. त्यांच्या या प्रयत्नांमुळे अनेक तरुण पुन्हा एकदा लोककलेकडे आकर्षित झाले आहेत.
लेखक, कवी, गायक, निवेदक, कलाकार, साऊंड ऑपरेटर, लाईट ऑपरेटर अशा अनेक भूमिका समर्थपणे पार पाडणारे अनिल बनसोडे हे तमाशा क्षेत्रातील खऱ्या अर्थाने “ऑल राऊंडर” व्यक्तिमत्त्व आहेत. पडद्यामागे राहून तमाशाची सर्व सूत्रे कुशलतेने हलवणारा हा अवलिया आज तमाशा क्षेत्रातील क्रमांक एक ऑल राऊंडर म्हणून ओळखला जातो.
परंपरा आणि आधुनिकता यांचा सुंदर संगम घडवत तमाशा कलेला नवसंजीवनी देणारे अनिल रामचंद्र बनसोडे हे महाराष्ट्राच्या लोककला विश्वातील एक प्रेरणादायी नाव बनले आहे. बालगंधर्व परिवार पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल माझ्या मुलाचे मनापासून हार्दिक अभिनंदन.
शब्दरचना – राष्ट्रपती सुवर्णपदक विजेत्या मंगलाजी बनसोडे करवडीकर





