सामाजिक

आंबेगाव तालुक्यातील वाळुंजनगरच्या शिरपेचात मनाचा तुरा; श्रेयस वाळुंज झाला सी.ए;प्रखर महत्वकांक्षा,जिद्द, चिकाटी आणि मेहनतीला आले यश !!

img 20260625 wa0833
1009948583

पंचनामा प्रतिनिधी – वाळुंज नगर (ता.आंबेगाव ) येथील श्रेयस किसन वाळुंज याने पहिल्याच प्रयत्नात सी.ए.(चार्टड अकाउटंट ) फायनल परीक्षेत घवघवीत यश संपादन करून सनदी लेखापाल होण्याचा बहुमान मिळविला.त्यामुळे परिसरातून त्याच्यावर कौतूकाचा वर्षाव होत आहे.

श्रेयसचे प्राथमिक शिक्षण लोणी येथे झाले.पाचवी ते दहावी अवसरी बुद्रक व अकरावी,बारावी व पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे येथील मॉर्डन महाविद्यालय येथे झाले.

श्रेयसचे वडील जिल्हा बॅकेत अधिकारी आहेत तर आई प्राथमिक शिक्षिका आहे. त्यामुळे घरातूनच शिक्षणाचे बाळकडू मिळालेल्या श्रेयसने आपल्या यशाचे सर्व श्रेय, आई वडील ,भाऊ आणि गुरजनांना दिले.

श्रेयसला मिळविलेल्या यशाबद्दल मा.सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील,मंत्रालयातील महसूल विभागाचे सहसचिव कैलास गायकवाड व ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

1009945506
1009850407

Related posts

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत ठशांची नोंद न होणाऱ्या वयस्कर शेतकऱ्यांसाठी आधार प्रमाणीकरणाची विशेष सुविधा !!

Chief Editor

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगावपीर,प्रगती विद्यालय वडगावपीर,माजी सैनिक योद्धा सेवा भावी संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने कारगिल विजय दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन !!

Chief Editor

भीमाशंकर कारखान्याची विनाकारण बदनामी करू नये – कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे

Chief Editor

Leave a Comment