सामाजिक

अन्यायकारक संचमान्यता निकषांविरोधात पुण्यात कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे धरणे आंदोलन !!

1009948122
1009948123

पुणे, दि. २५ जून : शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी प्रस्तावित करण्यात आलेल्या संचमान्यतेच्या नव्या निकषांविरोधात पुणे विभागीय कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या वतीने आज विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय, पुणे येथे धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात पुणे, सोलापूर व अहिल्यानगर जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.

संचमान्यतेतील नवीन निकषांमुळे शिक्षकांच्या कार्यभारात मोठी कपात होऊन हजारो शिक्षक अतिरिक्त ठरण्याची शक्यता निर्माण झाली असून संपूर्ण महाराष्ट्रातील कनिष्ठ महाविद्यालयांवरही त्याचे गंभीर परिणाम होणार असल्याची भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.

आंदोलनादरम्यान दिलेल्या घोषणांनी व अभ्यासपूर्ण भाषणांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयाचा परिसर दणाणून गेला. उपस्थित पदाधिकाऱ्यांनी नव्या संचमान्यता निकषांमुळे शिक्षणाची गुणवत्ता, शिक्षकांचे अस्तित्व व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितावर विपरीत परिणाम होणार असल्याचे सांगितले.

1009948119

या आंदोलनामध्ये महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे सरचिटणीस प्रा. लक्ष्मण रोडे, पुणे विभागीय कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे अध्यक्ष प्रा. सोपान कदम, पुणे विभाग व पुणे जिल्हा संघटनेचे सरचिटणीस प्राचार्य विक्रम काळे, सोलापूर जिल्हा संघटनेचेअध्यक्ष व
विभायीयकार्याधक्ष हरिदास गवळी विभागीय कार्याधक्ष हिम्मत तोबरे तसेच तीनही जिल्हा संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

आंदोलनादरम्यान विभागीय शिक्षण उपसंचालक डॉ. गणपत मोरे यांनी आंदोलनस्थळी येऊन शिक्षकांचे निवेदन स्वीकारले. शिक्षकांच्या मागण्या व निवेदन शासनापर्यंत सकारात्मकपणे आणि तातडीने पोहोचविण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

शिक्षक प्रतिनिधींनी संचमान्यतेतील अन्यायकारक निकष तात्काळ मागे घेण्यात यावेत, प्रचलित पद्धतीने संचमान्यता करण्यात यावी तसेच शिक्षकांची पदकपात होणार नाही याची शासनाने शासन निर्णय काढून हमी द्यावी, अशी मागणी केली.

यावेळी उपस्थित शिक्षकांनी एकजुटीने लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. आवश्यक असल्यास राज्यस्तरीय तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला.

1009945506
1009850407

Related posts

प्रभारी अधिकारी श्री.सचिन कांडगे यांनी पारगाव (कारखाना) पोलिस ठाण्याचा पदभार स्वीकारला !!

Chief Editor

मोरडे फूड्स प्रा. लि.कंपनी मध्ये समर्थ पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांची निवड !!

Chief Editor

आंबेगाव तालुक्यातील लोणी (धामणी ) येथे जलतारा प्रबोधन कार्यशाळा संपन्न !!

Chief Editor

Leave a Comment