सामाजिक

समर्थ लॉ कॉलेजची यशस्वी निकालाची गौरवशाली परंपरा कायम;विधी शिक्षणाच्या क्षेत्रात समर्थ लॉ कॉलेजचे दैदिप्यमान यश !!

1009943822
1009943822

बेल्हे येथील समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ लॉ कॉलेजने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ च्या विद्यापीठ परीक्षांमध्ये उज्ज्वल यश संपादन करत आपल्या उत्कृष्ट निकालाच्या परंपरेत आणखी एका सुवर्णपानाची भर घातली आहे. विद्यार्थ्यांच्या अथक परिश्रम, प्राध्यापकांचे गुणवत्तापूर्ण मार्गदर्शन आणि संस्थेची शैक्षणिक बांधिलकी यांचा सुंदर मिलाफ या यशातून अधोरेखित झाला आहे.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील कवडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रथम वर्ष एलएलबीचा निकाल तब्बल ९८.२९ टक्के लागला आहे. या परीक्षेत निलेश हाडवळे (८.९२ एसजीपीए) यांनी प्रथम क्रमांक मिळविला असून स्वप्निल घोलप (७.८४) यांनी द्वितीय तर रविता दांगट (७.७५) व प्रमिला वाघोले (७.७५) यांनी संयुक्त तृतीय क्रमांक पटकावला.

प्रथम वर्ष बी.ए. एलएलबीचा निकाल शंभर टक्के लागला असून शामा मलिक (८.१३) व अक्षदा पोखरकर (८.१३) यांनी संयुक्त प्रथम क्रमांक मिळविला. विश्वजीत माने (८.००) व भावना पानसरे (८.००) यांनी संयुक्त द्वितीय, तर गौरी डुकरे (७.८८) यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला.

द्वितीय वर्ष बी.ए. एलएलबीचा निकालही शंभर टक्के लागला असून श्रुति काढणे (८.३३) यांनी प्रथम, सिद्धी मोरे (८.२५) यांनी द्वितीय तर सिद्धी शेलोट (८.१३) यांनी तृतीय क्रमांक मिळविला.

तृतीय वर्ष बी.ए. एलएलबीचा निकाल ९०.४७ टक्के लागला असून स्नेहल कोहिनकर (७.५८) यांनी प्रथम क्रमांक पटकावला. सरोज राऊत (७.२५) यांनी द्वितीय तर आयाज मुलानी (७.१७) यांनी तृतीय क्रमांक मिळविला.

चतुर्थ वर्ष बी.ए. एलएलबीचा निकाल शंभर टक्के लागला असून सुजाता शिंदे (६९.८०%) यांनी प्रथम क्रमांक मिळवत यशाचा झेंडा रोवला. राहुल कारभारी (६६.५०%) यांनी द्वितीय तर श्वेता पवार (६२.६०%) यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला.

अंतिम वर्ष बी.ए. एलएलबीमध्ये श्रावण भगत (६३.९०%) यांनी प्रथम क्रमांक पटकावला. धनश्री कुलवडे (६०.००%) यांनी द्वितीय आणि वैष्णवी आरगडे (५८.८०%) यांनी तृतीय क्रमांक मिळवून महाविद्यालयाच्या यशोगाथेत मानाचा अध्याय जोडला.

विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके, कॅम्पस डायरेक्टर प्रा. राजीव सावंत, डॉ. लक्ष्मण घोलप, प्रा. शिवाजी कुमकर, प्रशासकीय अधिकारी प्रा. प्रदीप गाडेकर तसेच संकुलातील सर्व विभागांचे प्राचार्य, विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

1009944556

Related posts

मंदिरात रोख रक्कम दान करण्याच्या बहाण्याने महिलेचे साडेतीन तोळे वजनाचे मंगळसूत्र चोरट्यांनी लांबविले !!

Chief Editor

तमाशाफड मालक विलास गायकवाड उर्फ राज देवठाणकर यांचे निधन हे सरकारी अनस्थेचा बळी आहे- अरुण खरात ( तमाशा लोककला व लोक कलावंत अभ्यासक)

Chief Editor

मानाच्या १० पालख्यांसोबतच्या दिंड्यांना प्रति दिंडी २० हजार प्रमाणे २ कोटी ८० लाखांचे अनुदान मंजूर; मुख्यमंत्री वारकरी महामंडळामार्फत वाटप सुरू !!

Chief Editor

Leave a Comment