सामाजिक

श्री पद्ममणि जैन महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभागांतर्गत ”व्यक्तिमत्व विकास ” कार्यशाळेचे आयोजन !!

img 20260212 wa0112

पंचनामा लोणी (धामणी) प्रतिनिधी – पाबळ (ता. शिरूर ) येथे श्री पद्ममणि जैन महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभागांतर्गत ” व्यक्तिमत्व विकास ” कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होत.

पाबळ येथिल सुप्रसिद्ध लेखक शंकर नऱ्हे यांनी ” साहित्यातून व्यक्तिमत्व विकास ” बाळासाहेब जाधव काॅलेजचे प्रा.अरविंद कुटे यांनी ” निवेदन कौशल्यातून व्यक्तिमत्व विकास व रोजगाराच्या संधी ” , कस्तुरी काॅलेजचे प्रा.शिवाजी सोनटक्के यांनी ” सुलभ कौशल्ये व व्यक्तिमत्व विकास ” या विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या प्रसंगी उपप्राचार्या डाॅ. रेहाना बेग, सामाजिक कार्यकर्ते कैलास गायकवाड व बाबा ईनामदार व महाविद्यालयातील प्राध्यापक उपस्थित होते.

fb img 1769478999823

मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांनी सदर कार्यशाळेचा लाभ घेतला. यावेळी प्राचार्य डाॅ.संजय घोडेकर, संयोजिका डाॅ.शिल्पा शेटे यांनी प्रास्ताविक केले.डाॅ.गणेश सोनवणे यांनी सुत्रसंचालन केले व प्रा.अमित उकीर्डे यांनी आभार मानले.

Related posts

“उंचखडक येथील मुळे भावंडांनी गौरवग्रंथ आणि अभिष्टचिंतन सोहळ्यातून जागवल्या आईच्या आठवणी” !!

Chief Editor

लाखणगाव (ता. आंबेगाव) येथील शालेय विद्यार्थ्यांना ट्रेसेबल गिव्हींग फाउंडेशनच्या वतीने ६३०००/- रुपये किमतीच्या पाठ्यपुस्तकांचे मोफत वाटप !!

Chief Editor

पारगाव (शिंगवे) येथील अंगणवाडीतील बालकांना स्वातंत्र्यदिनानिमित्त शालेय साहित्याचे वाटप !!

Chief Editor

Leave a Comment