सामाजिक

जवळे (ता.आंबेगाव) येथील शिंदे मळ्यात बिबट्याचा वावर; कुत्र्यावर हल्ला !!

img 20260208 wa0522
img 20260208 wa0522

पंचनामा पारगाव (शिंगवे) प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील सर्वार्थाने प्रगतशील गाव म्हणून ओळख असणाऱ्या जवळे गावच्या शिंदे मळा या ठिकाणी दोन दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढत आहे.रात्री पहाटे तीन ते चारच्या सुमारास बिबट्याने नितीन लक्ष्मण शिंदे यांच्या पाळीव कुत्र्यावरती सहा फूट जाळी वरून गोठ्यात जाऊन हल्ला केलेला असून यामध्ये कुत्रा ठार झाला आहे.

यावेळी वनविभागाच्या गस्त पथकाने भेट देऊन पाहणी केली.तसेच गावच्या सरपंच सौ.वृषालीताई उत्तम शिंदे पाटील यांनी वन विभाग अधिकारी भोसले साहेब यांना संपर्क साधून पिंजरा लावण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आली आहे.

यावेळी पोत्रे भाऊसाहेब वनरक्षक, उत्तम शिंदे पाटील,महेश टेमगिरे व गावडेवाडी येथील रेस्क्यू टीम यांनी घटनास्थळी भेट दिली. अशी माहिती तंटामुक्तीचे अध्यक्ष हरिश्चंद्र शिंदे पाटील यांनी दिली.

img 20260208 wa0522

Related posts

आंबेगाव तालुक्यातील लोणी (धामणी ) येथे जलतारा प्रबोधन कार्यशाळा संपन्न !!

Chief Editor

मा.सैनिक, निसर्ग मित्र श्री.रमेश खरमाळे यांनी हरित संकल्पातून साजरा केलेला लग्नाचा वाढदिवस !!

Chief Editor

सावित्रीबाई फुले यांचे चरित्र समाजासाठी दिशादर्शक – स्नेहलताई शेळके समर्थ संकुलात सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी !!

Chief Editor

Leave a Comment