सामाजिक

लोणी (धामणी) येथे महाशिवरात्री निमित्ताने संपन्न होणार अखंड हरिनाम सप्ताह!!

img 20260208 wa0407(1)

पंचनामा लोणी (धामणी) प्रतिनिधी – लोणी (ता.आंबेगाव ) येथे महाशिवरात्र निमित्त अखंड हरीनाम सप्ताहाच्या ५३ वर्षानिमित्त शनिवार (दि.०७) ते रविवार (दि.१४) पर्यंत कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले आहे.

त्यानिमित सप्ताह काळात दररोज पहाटे ४ ते ६ काकडा आरती, अखंड विना वादन, सायंकाळी ४ ते ५ प्रवचन, सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ, व रात्री ७ ते ९ हरिकीर्तन, नऊ वाजता महाप्रसाद व रात्री १० नंतर हरिजागर हे कार्यक्रम आयोजित केले आहे.

शनिवार (दि.०७) ते रविवार (दि.१४) या काळात ह.भ.प बबन महाराज सिनलकर, ह.भ.प उज्वला सुक्रे, ह.भ.प महादेव महाराज बढेकर, ह.भ.प ज्ञानेश्वर महाराज ढगे पटील, ह.भ.प हनुमंत महाराज पोखरकर, ह.भ.प श्रीराम महाराज वाळूंज, ह.भ.प ज्ञानेश्वर महाराज थोरात, ह.भ.प नंदा आढाव, ह.भ.प किसन महाराज तांबे यांची अनुक्रमे प्रवचन होतील.

img 20260208 wa0409

तर शनिवार ( दि.०७) ह.भ.प वैभव महाराज राक्षे-देहू, रविवार ( दि.०८) ह.भ.प गणेश महाराज घोडेकर-कळंब, सोमवार (दि.०९) ह.भ.प जनार्दन महाराज रजपूत- धूळे, मंगळवार (दि.१०) ह.भ.प भरत महाराज थोरात- राजगुरुनगर, बुधवार (दि.११) ह.भ.प जयेश महाराज भाग्यवंत-डोंबिवली, गुरूवार (दि.१२) ह.भ.प दादा महाराज वायसळ- गंगापूर, शुक्रवार (दि.१३) ह.भ.प डॉ. विकासनंद महाराज मिसाळ- पिंपळगाव वाघा, शनिवार (दि.१४) ह.भ.प सुदर्शन महाराज शास्त्री- त्रिभुवनेश्वर देवस्थान पाथर्डी, रविवार (दि.१५) ह.भ.प बाळासाहेब महाराज रंजाळे- श्रीरामपूर व सोमवार ( दि.१६) रोजी सकाळी ८-३० ते १०-३० वाजता ह.भ.प लक्ष्मण महाराज नागरे-देवगड, नेवासा यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे.

दररोज हरिकीर्तन संपल्यानंतर रात्री ९ वाजता सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले आहे.या महाप्रसादाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.अशी माहिती ग्रामस्थांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

Related posts

मांदळेवाडी (ता.आंबेगाव) येथे वादळी वारा आणि पावसाने झाले शेतकऱ्यांचे नुकसान !!

Chief Editor

तमाशा क्षेत्रातील तेजस्वी आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व मंदाराणी खेडकर !!

Chief Editor

सागदरा सहकारी उपसा जलसिंचन योजनेच्या चेअरमनपदीसोमनाथ शंकर जाधव पाटील तर व्हाइस चेअरमनपदी भानुदास महादू जाधव पाटील यांची बिनविरोध निवड!!

Chief Editor

Leave a Comment